लंडन, 18 ऑक्टोबर : सर्वसाधारणपणे ज्या बजेटमध्ये संपूर्ण कुटुंबाचं जेवण होतं, किंवा ज्या बजेटमध्ये छोटी-मोठी पार्टी आयोजित करतात तेवढ्याच पैशात लंडनमधील एके ठिकाणी (Salt Bae’s Nusr-et London) केवळ एक कबाब मिळतो. हे रेस्टॉरन्ट तुर्कीमध्ये जन्म झालेला शेफ नुसरत गोक्सेने (Nusret Gökçe ) सुरू केला आहे आणि रेस्टोरन्टच्या जेवणापेक्षा जास्त त्याच्या हाय-फाय प्राइजची चर्चा जगभरात चर्चिली जात आहे.
सॉल्ट बेईच्या (Salt Bae) नावाने जगभरात प्रसिद्ध नुसरतच्या जेवणाचे सर्व व्हिडीओ आणि पिक्चर्स सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. त्यांनी नुकतच लंडनमध्ये एक रेस्टॉरंट सुरू केलं आहे. मात्र तेथील खाद्यपदार्थ इतके महाग आहेत की, तेथून पाणी घेण्यापूर्वीही विचार करावा लागेल. आता 87 हज़ारात एखादी डिश मिळत असेल तर त्याला खाण्याच्या नावावर लूटच म्हणावं लागेल. अशीच काहीशी बाब येथे येणाऱ्या ग्राहकाने ऑनलाइन लिहिली आहे. त्यामुळे रेस्टॉरंटला मान खाली घालावी लागली आहे. (A terrible insult to a famous chefs dish worth Rs 87000 The customer said)
असं अन्न कबाब शॉपवर अत्यंत स्वस्तात मिळतं...
ऑनलाईन रेस्टॉरंटचा रिव्ह्यू देताना एका ग्राहकाने लिहिलं की, अन्नाची किंमत अनावश्यकपणे इतकी जास्त ठेवण्यात आली आहे. इथलं अन्न काही विशेष नाही. त्याने पुढे लिहिलं आहे - 'मला वाटलं की हा काही विनोद असेल... दुर्दैवाने ते खरं होतं. स्टेक्स जेमतेम खाल्ले जात होते, फक्त किंमत ऐकूनच माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. मला नाइट्स ब्रिजमध्ये (Knightsbridge) 700 पेक्षा कमी किमतीत याहून चांगले कबाब मिळतात.
येथे खाणे खरोखरच धक्क्यात जाण्यासारखे होते. अखेरीस या ग्राहकाने असेही सांगितले की या घोटाळ्याच्या रेस्टॉरंटमध्ये येणे विसरून जा. या व्यतिरिक्त, बर्याच ग्राहकांचा असा विश्वास होता की हे फक्त सोशल मीडियावर दाखवण्यासाठी आहे, येथे जेवणासाठी पैसे देणे खरोखरच व्यर्थ आहे.
हे ही वाचा-कधी काळी बेघरासाठी राहत होती एका बाळाची आई; असं विचित्र काम करून झाली कोट्यवधी
ग्राहकाने जेवणानंतर सर्व कमाई उडवली
यापूर्वी एका व्यक्तीने नुस्र अत लंडनमध्ये (Salt Bae’s Nusr-et London) जेवणानंतर ते बिल ट्विटवर शेअर केलं होतं. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याला तीन मित्रांना पार्टी द्यायची होती. तेथे जेवल्यानंतर त्याचं बिल 12 लाखांपर्यंत गेलं होतं. हे बिल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि लोकांनी रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या किंमतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. शेवटी, एवढ्या जास्त किंमतीत सामान्य वस्तू विकण्याचे कारण काय, इंटरनेटवर अधूनमधून वाद होत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: London, Viral news