अदेन (येमेन), 30 डिसेंबर : येमेनच्या (Yemen) दक्षिणेकडचे शहर असलेल्या अदेनच्या(Aden) विमानतळावर एक मोठा स्फोट (blast) झाला. नवीनच स्थापित झालेल्या कॅबिनेट सदस्यांना घेऊन विमान (plane) उतरताक्षणीच हा स्फोट झाल्याचं समोर येते आहे. अदनच्या आरोग्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्त एजन्सी एपीनं (AP) सांगितलं, की या स्फोटात 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोबतच 60 लोक जखमी झाले आहेत. NDTV ने दिलेल्या ताज्या आकड्यानुसार ही संख्या 26 झाली आहे. येमेनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारमधले सर्व मंत्री आणि सदस्य सुरक्षित आहेत.
अधिकृतपणे स्फोटाची जबाबदारी कुणी घेतलेली नाही. स्फोट कुणी घडवला हे अजून समोर आलेलं नाही. पण येमेनी प्रवक्त्यांनी इराणच्या पाठिंब्याने हुथी अतिरेक्यांवर (Iran-backed Huthi rebels) संशय व्यक्त केला आहे.
सरकारच्या प्रतिनिधी मंडळातील कुणी दुर्घटनाग्रस्त झाल्याची बातमी अजून तरी हाती आलेली नाही. मात्र घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी तिथं मृतदेह पडलेलं पाहिल्याचं सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी आपली नावं जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. कारण त्यांनी माध्यमांशी अधिकृतपणे बोलणं अपेक्षित नव्हतं.
घटनास्थळावरून सोशल मीडियावर (Social media) शेअर केलेल्या फोटोजमध्ये विमानतळ परिसरात कोसळलेल्या वास्तूंचा ढिगारा आणि काचा दिसत आहेत. एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहे. आणखी एका फोटोमध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाची मदत करताना दिसतो आहे. त्याचे कपडे फाटलेले आहेत.
#WATCH Yemen: At least 5 people killed & dozens more wounded in an attack on Aden airport, shortly after a plane carrying a newly formed govt for Yemen arrived from Saudi Arabia today, reports Reuters quoting a local security source
(Video Source: Reuters) pic.twitter.com/a5Xf7vthzu
— ANI (@ANI) December 30, 2020
प्रतिस्पर्धी दक्षिणी फुटीरवादी गटासह सामंजस्य केल्यावर मंत्रिमंडळात फेरबदल झाला. मागच्या आठवड्यात शपथग्रहण झाल्यावर येमेनचे पंतप्रधान मईन अब्दुल मलिक सईद यांच्या नेतृत्वात बाकीचे मंत्री सौदीहून अदनला परतत होते. येमेनमध्ये वर्षानुवर्षे चाललेल्या गृहयुद्धादरम्यान येमेनचं आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेलं शासन सौदी अरेबियाची राजधानी रियाध इथून काम करत होते.