अफगानिस्तान, 21 नोव्हेंबर : अफगानिस्तानची राजधानी असलेलं काबुल एकामागे एक झालेल्या स्फोटांनी हादरलं आहे. 10हून अधिक रॉकेटद्वारे स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. शहराच्या मध्यभागी आणि उत्तरेकडील दाट लोकसंख्या असलेल्या ग्रीन झोनमध्ये हे स्फोट झाले आहेत. जोरदार स्फोटांच्या मालिकेमुळे मध्यवर्ती काबुल हादरलं आहे.
#UPDATES A series of loud explosions shake central Kabul, including several in quick succession
No immediate reports of any casualties but explosions occurred in densely populated parts of the Afghan capital including near the Green Zone pic.twitter.com/KPUB7EkI3A
सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रॉकेट स्फोटात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 21 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 14 रॉकेटने हे स्फोट घडवून आणल्याची माहिती मिळत आहे.
अफगानिस्तानातील काबुल शहरात एकामागे एक 10हून अधिक रॉकेट उडवड स्फोट, स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी नाही. pic.twitter.com/U3f4RBCynz
ग्रीन झोन जवळील अफगानिस्तान राजधानीच्या दाट लोकवस्तीच्या भागात स्फोट झाले आहेत. दोन स्फोट झाल्यानंतर एकामागे एक अनेक रॉकेटद्वारे स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटावेळी पोलिसांच्या गाडीवर निशाणा साधण्यात आला होता, ज्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. कोणत्याही संघटनेने शनिवारी झालेल्या या स्फोटांची अद्याप जबाबदारी घेतली नाही.