सीरियात रशियन विमान कोसळलं, 32 ठार

सीरियात रशियन विमान कोसळलं, 32 ठार

  • Share this:

06 मार्च : सीरियामध्ये एक रशियन सैन्याचं विमान कोसळलंय. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झालाय. रशियन संरक्षण मंत्रालयाने या बातमीला दुजोरा दिलाय.

सीरियातील रशियन सैन्याचं विमान खमेंइमिम हवाईतळावर लँड होत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत सहा पायलटसह 32 नागरिकांचा मृत्यू झालाय.

रशियाच्या वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एंतोनोव-26 विमान हे 6 क्रु मेंबर यांच्यासह 26 प्रवाशांना घेऊन जात होतं. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर 1600 फुट उंचावर विमान क्रॅश झालं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहितीसमोर येतेय.

 

First published: March 6, 2018, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading