मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

युक्रेनियन व्यक्ती कारने जाताना रस्त्यातच रॉकेट हल्ला; थरारक Video आला समोर

युक्रेनियन व्यक्ती कारने जाताना रस्त्यातच रॉकेट हल्ला; थरारक Video आला समोर

काही अंतरावर हा हल्ला झाला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

काही अंतरावर हा हल्ला झाला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

काही अंतरावर हा हल्ला झाला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

    नवी दिल्ली, 3 मार्च : Russia Ukraine War News Live Updates: रशियाकडून युक्रेनमधील हल्ले अधिक विध्वंसक झाले आहे. आतापर्यंत युक्रेनमधील अनेक धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहे. हे व्हिडीओ (visual of rocket attack from Cherinihiv) चिंता वाढवणारे आहेत. उत्तर युक्रेनमधील चेर्निहाइव्ह प्रदेशातील हल्ल्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. हे युद्ध संपावं, यासाठी जगभरातून मागणी केली जात असताना आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर रशियाने कीव्हबरोबरच, खार्कीव्ह आणि अन्य मोठय़ा लोकसंख्येच्या शहरांना लक्ष्य करत हल्लासत्र तीव्र केल़े. खार्कीव्हमधील पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाच्या मुख्यालयावर बुधवारी बॉम्बहल्ला करण्यात आला़. क्षेपणास्त्र हल्ला करून येथील एक रुग्णालय उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. दरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे. यात रस्त्यावरुन जात असताना एका व्यक्तीच्या समोर रॉकेल हल्ला होता. सुदैवाने ती गाडी लांब असल्याने बचावते. युक्रेनने रशियावर वॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा आरोप केला आहे. तर युनायटेड नेशन्स जनरल एसेम्बलीमध्ये युक्रेन युद्धावर आपात्कालीन बैठकीत रशियाला तातडीने आपले सैन्य युक्रेनमधून काढण्यास सांगितलं आहे. सॅटेलाइट फोटोंवरुन मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनची राजधानी कीवचा घेराव अधिक तीव्र केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine, Shocking video viral

    पुढील बातम्या