Home /News /videsh /

विमान धावपट्टी सोडून थांबलं रस्त्यावर, अपघातानंतरचा VIDEO आला समोर!

विमान धावपट्टी सोडून थांबलं रस्त्यावर, अपघातानंतरचा VIDEO आला समोर!

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेनंतरचा व्हिडिओ समोर आला आहे.

    तेहरान, 27 जानेवारी : इराण (Iran) मधील  बंदर-ए-माहशहर (Bandar-e-Mahshahr) मध्ये सोमवारी एक विमान उतरल्यानंतर धावपट्टी सोडून महामार्गावर लँड झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेनंतरचा व्हिडिओ समोर आला आहे. इराणची शासकीय वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,  माहशहर विमानतळावर विमान लँडिंगच्या वेळी पायलटने उशिराने उतरवले. त्यामुळे विमान धावपट्टी सोडून पुढे गेले. कॅस्पियन एअरलाईन्सचे मॅकॉनल डगलस जेट तेहरान (Tehran) च्या मेहराबाद विमानतळावरून 135 प्रवाशांना घेऊन निघाले होते. ही घटना भारतीय वेळेनुसार, सोमवारी सकाळी 07.50 वाजता घडली. या विमानात एका वृत्तवाहिनीचा पत्रकार प्रवास करत होता. त्याने सांगितलं की, विमानाचं मागील चाक तुटून वेगळं झालं होतं. चाक तुटून ते धावपट्टीवर दिसत होतं. तशाच परिस्थितीत विमान पुढे जात होते. इराणच्या विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. इराणमध्ये मागील वर्षी फेब्रुवारी 2019 मध्ये मोठी विमान दुर्घटना घडली होती. या विमान दुर्घटनेत 66 लोकांचा मृत्यू झाला होता. 2011 मध्येही विमान दुर्घटना घडली होती त्यावेळी अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 185 किमी स्पीडनं गाडी हवेत उडाल्याने भयंकर अपघात वेगाने गाडी चालवणे, म्हणजे अपघातांना निमंत्रण असते. मात्र कधी कधी काही लोकांना याच वेगाची नशा असते. अशाच एका रॅली स्पर्धेत एक स्पर्धेक थोडक्यात बचावला. एका विजेता रॅली चालकाने कबूल केले आहे की मृत्यूच्या दाडेतून बाहेर आल्यानंतर "जिवंत असल्याचा आनंद आहे", अशी भावना व्यक्त केली. मोनॅकोमध्ये होत असलेल्या विश्‍व रॅली चॅम्पियनशिप स्पर्धेत एक भयंकर प्रकार घडला. या स्पर्धेत एक स्पर्धेत 180 किमी वेगाने गाडी चालत गाडी हवेत उडली आणि मॉन्टे कार्लो येथे एका बर्फाच्छादित डोंगरावरून खाली पडली. या स्पर्धेकाला शोधण्यासाठी बऱ्याच कालावधीनंतर स्थानिक आणि आयोजकांना यश आले. अरुंद माउंटन ट्रॅकच्या बाजूला उभ्या असलेल्या स्थानिकांना हा प्रसंग अनुभवला आणि स्पर्धेकाला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. या स्पर्धेत तनक आणि सहकारी ड्रायव्हर मार्टिन जार्वोजा एका भयंकर अपघाताचे बळी पडले. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या