फोटोमागचं कारण सध्या विज्ञानाचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधूनच भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होत असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ‘नासा’मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दरवर्षी दिली जाते. त्यात संशोधनापासून इतर तांत्रिक बाबींवर काम करण्यासारख्या अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करता येतत आणि ‘नासा’तील तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करतात. यासाठी अत्यंत पारदर्शक प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांची निवड होते. या उपक्रमातील वैविध्य दिसावं आणि विद्यार्थ्यांची निवड करण्याच्या प्रक्रियेतील सर्वसमावेशकता लक्षात यावी, यासाठी ‘नासा’च्या वतीनं काही फोटो ट्विटरवर अपलोड करण्यात आले. मात्र त्यातील एका फोटोमुळे जोरदार वादाला तोंड फुटलं.Today's the day: applications for fall NASA internships are due!
Are you ready? Visit @NASAInterns and apply at: https://t.co/s69uwyR1LJ pic.twitter.com/CVwFJGYbms — NASA (@NASA) July 9, 2021
ट्रोलिंग सुरू विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि या उपक्रमाची प्रसिद्धी व्हावी, यासाठी ‘नासा’कडून इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांचे फोटो ट्विटरवर टाकण्यात आले. त्यामध्ये एका फोटोत भारतीय वंशाच्या एका मुलीने सरस्वती, लक्ष्मी आणि इतर हिंदु देवतांच्या मूर्तींसोबत काढलेला एक फोटो होता. या फोटोवर अनेकांनी टीका करायला सुरुवात केली. ‘नासा’नं आता वैज्ञानिक दृष्टीकोन सोडून धार्मिक दृष्टीकोन निवडला का, असे अनेक प्रश्न नेटिझन्सनी उपस्थित केले. हे वाचा -आगीत उडी घेत महिलेला वाचवून ठरला हिरो; घटनेत आलेल्या ट्विस्टनं पोहोचला गजाआड अनेकांनी केलं समर्थन अनेकजण या विद्यार्थिनीच्या समर्थनार्थ उभे राहिले आणि तिच्या या फोटोचं कौतुकही केलं.NASA is this some joke??? https://t.co/pmYAJYddzp
— Ayyuuusssshhhhh (@Saguraocacti) July 10, 2021
देवी सरस्वती ही विद्येची देवता असल्यामुळे तुला भरभरून यश आणि प्रसिद्धी मिळेल, असे आशीर्वादही अनेकांनी देऊन टाकले. दोन्ही बाजूंच्या नेटिझन्सनी या फोटोवरून अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पाडला.Today's the day: applications for fall NASA internships are due!
Are you ready? Visit @NASAInterns and apply at: https://t.co/s69uwyR1LJ pic.twitter.com/CVwFJGYbms — NASA (@NASA) July 9, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.