मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अरे बापरे! झोपेत त्यानं चक्क एअरपॉड गिळला; रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

अरे बापरे! झोपेत त्यानं चक्क एअरपॉड गिळला; रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

माणूस नकळतपणे कधी काय चूक करेल सांगता येत नाही. या व्यक्तीला त्याच्या चुकीमुळे जीव गमवावा लागला असतो.

माणूस नकळतपणे कधी काय चूक करेल सांगता येत नाही. या व्यक्तीला त्याच्या चुकीमुळे जीव गमवावा लागला असतो.

माणूस नकळतपणे कधी काय चूक करेल सांगता येत नाही. या व्यक्तीला त्याच्या चुकीमुळे जीव गमवावा लागला असतो.

वॉशिंग्टन, 7 फेब्रुवारी : तंत्रज्ञानानं (technology) आपलं जग सोपं केलंय. मात्र ते नीट वापरलं, हाताळलं नाही तर खूप धोकेही उद्भवतात. असाच अनुभव एका अमेरिकेतल्या माणसाला आला. या 38 वर्षीय माणसानं झोपेत (sleep) चक्क एयरपॉड (Airpod) गिळला. या माणसाचं नाव आहे ब्रॅड. ब्रॅड छातीत दुखतंय अशी तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी एक्स-रे काढला. या एक्स-रेमध्ये (X-ray) कळालं, की ब्रॅडच्या अन्ननलिकेत एअरपॉड अडकला आहे. डॉक्टरांनी एन्डोस्कोपी (endoscopy) करून हा एअररपॉड बाहेर काढला.

ब्रॅडनं सांगितल्यानुसार, सकाळी उठल्यानंतर तो पाण्यानं तोंड धूत होता. मात्र घशात काही वेगळं वाटलं नाही. पण छातीत मात्र जरा विचित्र वाटलं. पुढं रोजचा दिवस सुरू झाला. ब्रॅडनं एअरपॉड शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र सापडला नाही. घरच्यांना विचारल्यावर ते म्हणाले, तुझ्या छातीत (chest) दुखतं आहे ना, कदाचित गिळला असशील तू. अर्थात ते गंमत करत होते. पण कुणालाच माहीत नव्हतं की हे खरं होईल.

ब्रॅड सांगतो, की मी नशीबवान होतो कारण मी एअरपॉड गिळला, तरी तो अशा ठिकाणे जाऊन बसला जिथं मला त्याचा काही धोका झाला नाही. शिवाय तो अडकून बसला नाही. अन्यथा श्वास घेणं अवघड झालं असतं. मी योग्य वेळी हॉस्पिटलला (hospital) पोचलो आणि सर्जरीच्या मदतीनं हा एअरपॉड काढला गेला.

(वाचा - मालकीणीला पाहून कुत्रा झाला भलताच इमोशनल, पाहा त्यांच्या प्रेमाचा हा Video)

डॉक्टरांनी ब्रॅडला आधीच इशारा दिला होता, की एअरपॉड जर आपल्या जागेवरून घसरत खाली गेला तर पोटात किंवा फुफ्फुसातही जाऊ शकतो. मात्र सर्जरी यशस्वी झाली आणि धोका टळला. आता सर्जरीनंतर ब्रॅड नीटपणे जेवू शकतो आणि ऑफिसलाही (office) जाऊ शकतो.

First published:

Tags: Sleep, Stomach, Surgery