हाँगकाँग,30 जानेवारी: मानवी मैत्रिणींपेक्षा सेक्स डॉलला (Sex doll) डेट (Date) करणं सोपं आहे, असा साक्षात्कार झाल्यानं हाँगकाँगमधील (Hongkong) एका 36 वर्षीय व्यक्तीनं एका सिलिकॉन पुतळा असणाऱ्या सेक्स डॉलशीच एंगेजमेंट करण्याचा चमत्कार करून दाखवला आहे.
आई-वडिलांसोबत राहणाऱ्या झी टियानरॉंगनं (Xie Tianrong) आपली फियान्से (Fiance) असलेल्या सेक्सडॉलला आयफोन 12 सारख्या अनेक महागड्या वस्तू भेट दिल्या असून, या सेक्सडॉलकडं आता 20 अत्यंत महागड्या कपड्यांचे जोड आणि 10 शूजच्या जोड्या आहेत. या सेक्सडॉलचं नाव मोची (Mochi) असं असून, ती सर्वसाधारण माणसाच्या उंचीची आहे. तिला दुखापत होईल या भीतीने झी टियानरॉंगनंनं तिला हातही लावलेला नाही. तिची त्वचा खराब होईल, या भीतीनं तिचं चुंबनसुद्धा घेतलेलं नाही.
डेली टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, झी टियानरॉंगनं सांगितलं की, यापूर्वी माझ्या अनेक मैत्रिणी होत्या; पण आता मला फक्त बाहुल्यांचं आकर्षण वाटतं. अर्थात मी सेक्सडॉलशी कधीही सेक्स केलेला नाही. मी तिचा आदर करतो आणि मला फक्त तिची कंपनी, सोबत हवी आहे. लाल केस असलेली ही सेक्सडॉल मोची, झी टियानरॉंग झोपलेला असताना त्याच्या शेजारी बसते. तर तो तिला ओलसर कपड्याने स्नान घालतो आणि मग टाल्कम पावडर लावतो.
दहा वर्षांपूर्वी झी टियानरॉंगला आपल्याला बाहुल्यांचं (Dolls) प्रचंड आकर्षण वाटत असल्याची जाणीव झाली. हाँगकाँगमधील एका स्टोअरमध्ये त्यानं एक बाहुली पाहिली आणि तेव्हा त्याला पहिल्यांदा याची जाणीव झाली. त्यावेळेस या बाहुलीची किंमत 80 हजार युआन (9 लाख रुपयांपेक्षा जास्त) होती आणि झीला ती विकत घेणं शक्य नव्हतं. 2019 मध्ये, त्यानं ती बाहुली इंटरनेटवर पाहिली आणि तिची किंमत फक्त 10 हजार युआन (अंदाजे 1 लाख रुपये) होती. त्यानं ताबडतोब ही बाहुली, मोची खरेदी केली. ती घरी आल्यापासून त्याने आपला बहुतांश वेळ आपल्या या सिलिकॉन गर्लफ्रेंडची (Silicon Girlfriend) काळजी घेण्यात घालवला आहे.
द सनच्या वृत्तानुसार, त्याच्या आधीच्या मानवी मैत्रिणींविषयी (Human Girlfriends) बोलताना तो म्हणाला, त्या अगदी उघडपणे सतत काहीनाकाही गोष्टींची मागणी करायच्या. ते एकत्र असतानाही या मैत्रिणी सगळा वेळ फोनवर व्यस्त असायच्या. मोचीच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही, कारण ती फक्त त्याच्याकडे लक्ष देते.
हे देखील वाचा - 5 वर्षे आणि 6 कोटींचं बिल; रुग्णालयातील चार भिंतींमध्ये पूनमचं आयुष्यचं बदललं; मात्र अजूनही हिंमत कायम!
सेक्स डॉल्सबाबतची अशी कल्पनारम्यता यापुढे अगदीच अशक्य नाही. नोव्हेंबर महिन्यात कझाकिस्तानच्या (Kazakhstan) एका बॉडीबिल्डरने (Bodybuilder) आठ महिन्यांपर्यंत डेटिंग केल्यानंतर अशाच एका सेक्सडॉलशी लग्न केलं. हे खूप विचित्र किंवा अप्रचलित वाटू शकते पण हा बॉडीबिल्डर मार्गो (Margo) नावाच्या आपल्या सेक्स डॉलच्या अतिशय प्रेमात होता. त्यानं या विवाहसोहळ्याची एक छोटी क्लिपही त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला आहे. 2019 मध्ये हा बॉडीबिल्डर आपल्या या सिलिकॉन जोडीदाराला हा प्रश्न विचारल्यानंतर मार्च महिन्यात तो तिच्याशी लग्न करणार होता. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळं (Corona Virus Pandemic) त्याला त्याचा बेत काही महिने पुढं ढकलावा लागला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ट्रान्सजेंडर रॅली दरम्यान त्याच्यावर हल्ला झाला त्यामुळं हा विवाह सोहळा आणखी पुढं गेला. अखेर नोव्हेंबरमध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला आणि एक मानव आणि एक सिलिकॉन डॉल पती-पत्नी बनले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.