21 वर्षाच्या पुरूषाने दिला मुलीला जन्म

21 वर्षाच्या पुरूषाने दिला मुलीला जन्म

2017च्या सुरुवातीला एका स्पर्म डोनरच्या मदतीने क्रोसला गर्भधारणा झालीय. या घटनेनंतर क्रोस जगात सर्वत्र चर्चेत आलाय. 16जूनला लंडनच्या ग्लॉस्टर शायर रॉयल रुग्णालयात त्याने एका मुलीला जन्म दिला

  • Share this:

10जुलै: असं म्हणतात की पुरूषाला कधीही प्रसुतीचं दु:ख वेदना समजू शकत नाही. पण लंडनमध्ये खरोखर हे दु:ख एका पुरुषानं अनुभवलंय. हायडेन क्रॉस नावाच्या एका पुरुषानं 16 जूनला एका गोंडस मुलीला जन्म दिलाय.

2017च्या सुरुवातीला एका स्पर्म डोनरच्या मदतीने क्रोसला गर्भधारणा झालीय. या घटनेनंतर क्रोस जगात सर्वत्र चर्चेत आलाय. 16जूनला लंडनच्या ग्लॉस्टर शायर रॉयल रुग्णालयात त्याने एका मुलीला जन्म दिला. क्रॉस जन्माला पुरूष म्हणून आला नव्हता. क्रॉस जन्मत: एक मुलगी होता.तीन वर्षापूर्वी लिंग परिवर्तन करून तेव्हापासून क्रॉस पुरूष होऊन आनंदानं राहत आहे.लिंग परिवर्तन करायला त्याला तब्बल 400 पाउन्डचा खर्च आला.

ब्रिटीश आरोग्य सेवेनं क्रॉसला स्पर्म देण्यास नकार दिला होता. सगळ्यात गंमत म्हणजे लिंग परिवर्तनानंतर क्रोसला स्पर्म डोनरही फेसबुकवर मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 04:33 PM IST

ताज्या बातम्या