मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

मंगळ मोहिमेला मोठा धक्का; एलन मस्क यांच्या स्पेसएक्स SN8 रॉकेटचा स्फोट

मंगळ मोहिमेला मोठा धक्का; एलन मस्क यांच्या स्पेसएक्स SN8 रॉकेटचा स्फोट

अमेरिकेतील उदयोगपती एलन मस्क (Elon Musk) यांच्या मंगळ  मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. टेस्टिंगवेळी त्याचा स्फोट होऊन राख झाली.

अमेरिकेतील उदयोगपती एलन मस्क (Elon Musk) यांच्या मंगळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. टेस्टिंगवेळी त्याचा स्फोट होऊन राख झाली.

अमेरिकेतील उदयोगपती एलन मस्क (Elon Musk) यांच्या मंगळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. टेस्टिंगवेळी त्याचा स्फोट होऊन राख झाली.

  • Published by:  Meenal Gangurde

वॉशिंग्टन, 10 डिसेंबर : अमेरिकेतील उदयोगपती एलन मस्क (Elon Musk) यांच्या मंगळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या या मोहिमेसाठी वापरण्यात येणारे SpaceX स्टारशिप (starship)  SN8 प्रोटोटाइप रॉकेटचा स्फोट होऊन त्याची राख झाली. टेक्सासच्या समुद्र किनाऱ्यावर रॉकेट टेस्टिंगवेळी ही घटना घडली. परंतु यानंतर देखील कंपनीचा आपल्या मोहिमेवरील विश्वास कमी झाला नसून उत्तम टेस्टिंग, स्टारशिपच्या टीमचे अभिनंदन असा मेसेज लिहून त्यांनी आपल्या वैज्ञानिकांचे मनोबल वाढवले आहे.

या रॉकेटच्या टेस्टिंगआधी टेस्ला कार उत्पादनक कंपनीचे मालक आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी ट्विट करत ‘मंगळा, आम्ही येत आहोत,’ असं म्हटलं होतं. परंतु टेस्टिंगवेळी त्याचा स्फोट होऊन राख झाली. रॉकेट लँडिंगचा वेग अति असल्याने त्याचा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा मस्क यांनी ट्विट करत टेक-ऑफ, फ्लाइटमधील स्थितीत बदल आणि स्फोटापूर्वी तंतोतंत लँडिंगचा मार्ग. “आम्हाला आवश्यक असलेला सर्व डेटा मिळाला! स्पेसएक्स टीमचे अभिनंदन असे म्हटले. बुधवारी या रॉकेटच्या चाचणीला सुरुवात झाल्यानंतर अनुक्रमे पहिलं आणि दुसरं इंजिन बंद पडण्यापूर्वी रॉकेट सरळ आकाशात झेपावलं. त्यानंतर 4 मिनिटे आणि 45 सेकंदानंतर तिसरे इंजिन बंद होऊन रॉकेट अगदी सरळ मार्गाने परत येऊ लागले. लँडिंगच्या काही सेकंद आधी पुन्हा इंजिनं सुरु झाली, परंतु त्याच्या अतिवेगामुळे ते जोरात लँड होऊन त्याचा स्फोट झाला.

कंपनीला प्रकाशाच्या वेगाने उड्डाण करणारं रॉकेट तयार करायचं आहे त्यासाठी या  आठवड्यात आधी अनेक लहान प्रोटोटाइप रॉकेट्सच्या चाचण्या घेण्यात आल्या ज्या उड्डाणानंतर एका मिनिटाच्या आतच स्फोट झाला होता. अनेक अयशस्वी उड्डाणानंतर या रॉकेटच्या टेस्टिंगचं SpaceX च्या ट्विटर खात्यावरून लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं. SN8 स्टारशिप नंबर 8 या रॉकेट त्यातील 3 इंजिनं यांचं एरोडायनॅमिक्स तपासणं तसंच जमिनीवर परतताना ते स्पेसएक्सच्या फाल्कन 9 प्रमाणेच उभं खाली येतं का हे तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात आली. या टेस्टिंगमध्ये आपण ठरवलेली किती उद्दिष्ट पूर्ण केली हे तपासणं एवढंच या टेस्टचं यश अवलंबून नाही पण त्यातून आपण काय शिकलो याला खूप महत्त्व आहे. या शिकवणीतून पुढचं स्टारशिप डेव्हलप करताना काय सुधारणा करायची हे आमच्या लक्षात आलं, असं या संदर्भात कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीत म्हटलं आहे. त्याचबरोबर रॉकेट आकाशात झेपावण्याआधी जरी स्फोट झाला तरीही मिशन  अयशस्वी झालं असं म्हणता येत नाही. नवीन SN9 प्रोटोटाइप रॉकेटचे काम देखील जवळपास पूर्ण होत आले आहे.

अमेरिका-मेक्सिको सीमेजवळील दक्षिण टेक्सासच्याजवळ असलेल्या मेक्सिकोच्या वाळवंटात या चाचण्या केल्या जात आहेत. मुद्दाम या चाचण्या निर्जन ठिकाणी करण्यात येत आहेत कारण जर चाचणी फसली तरीही कोणत्याही माणसाला किंवा निसर्गाला धोका पोहोचू नये. मस्क यांनी नुकतीच कॅलिफोर्नियामधून दक्षिण अमेरिकेमधील राज्यांमध्ये स्थायिक होण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर भविष्यात तयार होणारं स्टारशिप रॉकेट नऊ ऐवजी 37 इंजिनसह सुसज्ज असेल आणि ते 120 मीटर उंच असेल. त्याचबरोबर यामध्ये  100 टन कार्गो वाहून नेण्याची क्षमता असेल. एलन मस्क यांना यापैकी काही स्पेसशिप मंगळावर पाठवायची इच्छा आहे पण सध्यातरी ही इच्छा नजिकच्या भविष्यात पूर्ण होण्याची चिन्ह दिसत नाहीत.  नासा आपलं चंद्रावर असलेलं अस्तित्व 2024 पर्यंत  वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. जपानी अब्जाधीश युसाकू मैझावा 2023 मध्ये चंद्रावर जाण्यासाठी मोठी रक्कम मोजणार आहे. हीच निकटच्या भविष्यातली चांद्र मोहिम आहे.

First published: