आजोबांनी तिला लग्नासाठी नटलेलं पाहावं यासाठी नातीनं केला 320 किमींचा प्रवास

आजोबांनी तिला लग्नासाठी नटलेलं पाहावं यासाठी नातीनं केला 320 किमींचा प्रवास

केवळ लग्नाचा सोहळा आजोबांबरोबर साजरा करण्यासाठी एक तरूणी 320 किलोमीटर प्रवास करून त्यांना भेटायला गेली.

  • Share this:

लंडन, 23 सप्टेंबर : जगभरात कोरोनाने (Coronavirus) थैमान घातलं आहे. सर्वच घटकांना याचा मोठा फटका बसला असून, सार्वजनिक जीवन यामुळं अस्ताव्यस्त झालं आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर देखील यामुळे बंधन आली आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त धोका हा ज्येष्ठ नागरिकांना आहे. तरुणांच्या तुलनेत या व्यक्तींना जास्त धोका आगे. त्याचबरोबर मधुमेह (Diabetis) आणि उच्च रक्तदाब (Hypertention) हे आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा मोठा धोका आहे. परिणामी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.

दरम्यान वृद्धाश्रमात राहत असलेल्या ज्येष्ठांची काळजी देखील विशेष पद्धतीने घ्यावी लागते आहे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या कार्यक्रमात जाण्यापासून सर्वच देशांमध्ये रोखण्यात येते आहे. पण अशावेळी जर एखाद्या आजोबांना त्यांची नात भेटायला गेली तर त्यांना होणारा आनंद खूप मोठा असतो. इंग्लंडमध्ये अशी घटना घडली आहे की केवळ लग्नाचा सोहळा आजोबांबरोबर साजरा करण्यासाठी एक तरूणी 320 किलोमीटर प्रवास करून त्यांना भेटायला गेली.

(हे वाचा-कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचा दावा करणाऱ्या शास्त्रज्ञाचा WHOवर गंभीर आरोप)

इंग्लडंची राजधानी असलेल्या लंडनमधील एका मुलीने लग्नाआधी आपल्या आजोबांना भेटण्यासाठी तब्बल 320 किलोमीटर गाडीने प्रवास केला. अलेक्स पिअर्स (Alex Pearce) या 36 वर्षांच्या मुलीनं हा प्रवास स्वतः गाडी चालवत पूर्ण केला. आजोबा तिच्या लग्नाला येऊ शकत नसल्यानं तिनं नवरीचा ड्रेस घालून त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. लग्नाचा केक आणि शॅम्पेन घेऊन जात तिनं आपल्या लग्नाचा आनंद आजोबांबरोबर साजरा केला. तिच्या आजोबांचं नाव ग्रॅहम बर्ली (Graham Burley) आहे, वय झाल्यानं ते लग्नाला येऊ शकले नाहीत.

(हे वाचा-चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना म्हणाला 'जोकर', झाला 18 वर्षांचा कारावास)

मात्र त्यांच्या नातीने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी 320 किलोमीटरचा लांब पल्ला गाठत भेट घेतली. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या या काळात वय झालेल्या व्यक्तींना सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या आजोबांना आपल्या नातीच्या लग्नात हजेरी लावता आली नाही. Ladbible ने याबाबत वृत्त दिले आहे.

सुरक्षेचं भान राखलं

विशेष म्हणजे आपल्या आजोबांच्या भेटीवेळी देखील या मुलीनं  वृद्धाश्रमात सुरक्षेची काळजी घेतली. तिला त्यांना जवळून भेटता आलं नाही. सुरक्षित प्लॅस्टिक पडद्याच्या अडून तिनं आपल्या आजोबांची भेट घेतली. त्यामुळं त्या ठिकाणी असणाऱ्या इतर वृद्ध व्यक्तींना देखील संकटात न टाकता तिनं आपल्या आजोबांची भेट घेतली. आयुष्यातील या महत्त्वाच्या आणि अतिशय आनंदाच्या दिवशी नातीला कवेत घेता न आल्यानं ग्रॅहम यांना अतिशय दुःख झालं.

 

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 23, 2020, 1:31 PM IST

ताज्या बातम्या