...जेव्हा देवमासा माणसाकडे मदत मागतो

...जेव्हा देवमासा माणसाकडे मदत मागतो

त्या माशाने त्या पाणबुड्याचा हात पकडला.त्यामुळे तो पाणबुड्या गोंधळला. ग्रुपमधल्या इतर लोकांना काहीशी चिंता वाटू लागली.

  • Share this:

08 मे : देवमासा म्हणजे माशांची सगळ्यात मोठी प्रजाती. त्यामुळे हा मासा पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात.  मॅक्सिकोमध्ये पाणबुड्यांचा एक ग्रुप समुद्रात गेला असताना त्यांच्या नजरेस असाच एक प्रचंड मोठा देवमासा पडला.

अचानक हा देवमासा त्या ग्रुपच्या एका पाणबुड्याकडे आला. तेव्हा त्या पाणबुड्याला वाटलं की हा मासा आपल्या शेजारून निघून जाईल. मात्र पुढे जे घडलं ते सर्वांसाठीच अनपेक्षित होतं. त्या माशाने त्या पाणबुड्याचा हात पकडला.त्यामुळे तो पाणबुड्या गोंधळला. ग्रुपमधल्या इतर लोकांना काहीशी चिंता वाटू लागली.

पण नंतर त्यांना त्या माशाची हतबलता लक्षात आली. एक भलामोठा दोर त्या महाकाय अशा देवमाशाभोवती गुंडाळला गेला होता,ज्यामुळे त्याचे कल्लेही छाटले गेले होते. हे पाहिल्यानंतर त्या पाणबुड्याने क्षणाचाही वेळ वाया न घालवता आपल्याकडे असलेल्या सुरीने तो दोर कापण्यास सुरुवात केली. आणि मिनिटभरातच त्या दोराच्या जोखडातून देवमाशाची सुटका झाली.

त्या दोराची स्थिती आणि माशाच्या शरीरावरच्या जखमा पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की अनेक वर्षांपासून तो अजस्त्र दोर त्या माशाभोवती गुंडाळला गेला असावा.  निसर्गाची नितांतसुंदर निर्मिती असलेल्या देवमाशाला हा दोर मात्र एखाद्या साखळदंडासारखा भासला असावा.

कोणताही प्राणी विनाकारण इतरांना त्रास देत नाही, याचीही प्रचिती या संपूर्ण घटनेतून आलीय.

First published: May 8, 2017, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading