S M L

50 वर्षांपूर्वी झाला होता घटस्फोट: आता पुन्हा अडकत आहेत लग्नाच्या बेडीत

आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांच्या लग्नाची पार्टी त्यांचा नातू देणार आहे. अमेरिकेतील केन्टुकीमधील ही घटना आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 3, 2018 10:08 PM IST

50 वर्षांपूर्वी झाला होता घटस्फोट: आता पुन्हा अडकत आहेत लग्नाच्या बेडीत

03 एप्रिल: तब्बल  50 वर्षांपूर्वी  घटस्फोट घेतलेलं एक जोडपं आत पुन्हा विवाहाच्या बंधनात अडकतं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांच्या लग्नाची पार्टी त्यांचा नातू देणार आहे. अमेरिकेतील   केन्टुकीमधील ही घटना आहे.

हॅरोल्ड हॉलँड आणि लिलियान बारनेस  या दोघांनी 1955 साली लग्न केलं होतं. पुढे 12 वर्ष त्यांचा संसार व्यवस्थित चालला. त्यांना पाच मुलंही झाली. पण काही कारणांमुळे अखेर 1967 साली ते वेगळे झाले होते. तेव्हा हॅरॉल्ड घरात लक्ष देत नसल्यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद झाले होते. पण आता माझी वागणूक बदलेल अशी कबुलीच हॅरॉल्डने दिली आहे. तसंच आपण दोघांना शेवटचं पाऊल सोबत टाकायचं  असल्याची इच्छा दोघांनी व्यक्त केली आहे.   दोघांनीही दुसरं लग्न केलं होतं. पण दोघांचेही पार्टनर्स 2015  साली निवर्तले. त्यामुळे एकामेकाला सोबत शेवटचा काळ व्यतीत करण्याचा दोघांनीही निर्णय घेतला आहे.

हॅरोल्ड आता 83 वर्षांचा आहे तर  लिलियान 78 वर्षांची आहे.  50 वर्षाच्या लग्नानंतर घटस्फोट घेणारे अनेक जण असतात. पण घटस्फोटाच्या  50 वर्षानंतर पुन्हा लग्न करणारं हे जगातलं  पहिलंच जोडपं असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 10:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close