Home /News /videsh /

या देशानं नवं वर्षं साजरं करताना जाळल्या 874 कार, परंपरा आहे जुनी

या देशानं नवं वर्षं साजरं करताना जाळल्या 874 कार, परंपरा आहे जुनी

जगात असा एक देश आहे जिथं नव्या वर्षाच्या स्वागताला स्वतःच्याच कार जाळण्याची पद्धत आहे. मात्र त्यामुळे प्रदुषणात चांगलीच भर पडते.

    पॅरिस, 2 जानेवारी: फ्रान्समध्ये (France) यंदा नवं वर्ष (New Year) साजरं करताना तब्बल 874 कार (Cars) जाळल्या (Burned) गेल्या आहेत. दरवर्षी फ्रान्समध्ये नव्या वर्षाचं स्वागत कार जाळून केलं जातं. फ्रान्समधील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक कार जाळून नव्या वर्षाचं स्वागत करत असतात. या कार जाळण्याच्या प्रकाराला आवर घालण्याचं काम पोलीस सातत्यानं करत असतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत पोलिसांना यंदा जास्त यश मिळाल्याचं चित्र दिसलं.  गेल्या वर्षीपेक्षा कमी प्रमाण फ्रान्समध्ये गेल्या वर्षी 1316 बाईक जाळण्यात आल्या होत्या. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमैनिन यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं पोलीस फ्रान्समधील विविध भागांत तैनात होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामुळे यंदा कमी प्रमाणात गाड्या जाळल्या गेल्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक ठिकाणी गाड्या जाळण्याच्या प्रकारावर आळा घालण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे.  काय आहे पद्धत? जे जे जुनं, खराब आणि टाकाऊ आहे, ते जाळून टाकण्याची परंपरा फ्रान्समध्ये आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये ही प्रथा आहे. त्यामुळे खराब झालेल्या, इन्शुरन्स नसलेल्या आणि टाकाऊ गाड्या नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जाळून टाकल्या जातात. त्यामुळे वातावऱणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि हवेचा दर्जा बिघडायला त्यामुळे सुुरवात होते. यासाठीच प्रशासनाकडून नागरिकांना गाड्या जाळण्यापासून रोखलं जातं.  दंग्यांपासून वाढलं प्रमाण 2005 साली फ्रान्समध्ये उफाळलेल्या दंग्यानंतर गाड्या जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. त्या वर्षी फ्रान्समध्ये 8810 गाड्या जाळण्यात आल्या होत्या.  हे वाचा - वाढतंय कोरोनाचं प्रमाण फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाचं प्रमाण वाढत चालल्याचं चित्र आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारा फ्रान्स हा जगातील सहावा देश बनला आहे. गेल्या 24 तासात फ्रान्समध्ये 2,19,126 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. त्याखोलाखाल भारत, ब्राझील, ब्रिटन आणि रशिया यांचा नंबर लागतो.
    Published by:desk news
    First published:

    Tags: France, New year, Vehicles

    पुढील बातम्या