मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ही 21 वर्षीय सौंदर्यवती बनली हिजाब घातलेली ब्रिटनची पहिली मॉडेल

ही 21 वर्षीय सौंदर्यवती बनली हिजाब घातलेली ब्रिटनची पहिली मॉडेल

वेगळी वाट चोखाळणाऱ्या स्त्रिया कायमच लक्षवेधी ठरतात. एक अवघ्या 21 वर्षांची मॉडेल अशीच एका कारणासाठी चर्चेत आली आहे.

वेगळी वाट चोखाळणाऱ्या स्त्रिया कायमच लक्षवेधी ठरतात. एक अवघ्या 21 वर्षांची मॉडेल अशीच एका कारणासाठी चर्चेत आली आहे.

वेगळी वाट चोखाळणाऱ्या स्त्रिया कायमच लक्षवेधी ठरतात. एक अवघ्या 21 वर्षांची मॉडेल अशीच एका कारणासाठी चर्चेत आली आहे.

  • Published by:  News18 Desk
लंडन, 27 डिसेंबर : हिजाब (Hijab) परिधान करणं हे इस्लाम (Islam) धर्मात स्त्रियांसाठी शालीनतेचं लक्षण मानलं जातं. हिजाब घालावा की नाही याबाबत बदलत्या सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीत अनेक मतमतांतरंही दिसून येतात. हिजाब घालून मॉडेलिंग करणारी इकराम आब्दी (Ikram Abdi) हिनं जणू सौंदर्याचे सगळे निकषच मोडीत काढले आहेत. इकराम 21 वर्षांची असून हिजाब घालून वोग (Vogue) मासिकाच्या कव्हरवर झळकणारी ब्रिटनची पहिली मॉडेल (first model of Britain) बनली आहे. 2019 मध्ये इकराम बरबेरी ब्रँडचा चेहराही बनली होती. हिजाबबाबत बोलताना इकराम म्हणते, की हिजाब ही गोष्ट तिच्यासाठी विनम्रतेशी जोडलेलं आहे. मुस्लीम असल्याने तिच्यासाठी विनम्र होणं खूप महत्त्वाचं आहे. एक मुस्लीम व्यक्ती म्हणून तिला जगाला दाखवून द्यायचं होतं, की हिजाब घालूनही तुम्ही फॅशनेबल दिसू शकता. हिजाब सौंदर्याचं प्रतीक इकराम पुढे म्हणते, "हिजाब केवळ इस्लामचं प्रतिनिधीत्व करत नाही तर सौंदर्याचंही ते प्रतीक आहे. नव्यानं दाखल होणाऱ्या सोमाली मॉडेल्सकडे पाहून तिला प्रेरणा मिळते. विशेषतः अशा क्षेत्रात हिजाब घातलेल्या महिलांचं येणं ही मोठी गोष्ट आहे जिथं त्यांना आजवर असं हिजाब घातलेल्या रूपात पाहिलं गेलं नाही. हिजाब घालून तरुण मुलींना हा संदेश दिला जाऊ शकतो, की तुम्ही कुठल्याही धर्म, वय, लिंग किंवा वयाच्या असल्यात तरी आपापल्या क्षेत्रात उंचीवर पोहोचू शकता. हिजाब घालून येणाऱ्या पुढच्या पिढीच्या मॉडेल्ससाठी यातून रस्ता मोकळा होईल असंही ती म्हणते. इकरामनं आजवर रोलँड मॉरेट, टॉमी हिलफिगर, मॉली गोडार्ड, हिमबर्ग अशा मोठमोठ्या ब्रॅन्ड्ससह नामवंत ब्रिटिश डिझायनर्ससाठी काम केलं आहे.
First published:

Tags: Model

पुढील बातम्या