जकार्ता, 9 डिसेंबर : इंडोनेशियाच्या (Indonesia) लम्पुग, प्रिंगसेवू रिजेन्सी (Pringsewu regency Lampung) येथील शाळेत पतंग उडविण्याच्या कार्यक्रमादरम्यान एक मोठा अपघात घडला आहे. एक मोठा पतंग उडविणारा 12 वर्षाचा मुलगा पतंगासह हवेत 30 फूट उडी मारून खाली कोसळला आणि यात तो गंभीर जखमी झाला. या वेदनादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वी जकार्तामध्येही पतंगामुळे अनेक मुलांना दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
डेली मेलच्या वृत्तानुसार, हा मुलगा पतंग उडवत होता. 1 डिसेंबर रोजी लम्पुंगच्या प्रिंगसेवू रिजेन्सी येथील एका हायस्कूलमध्ये ही घटना घडली. या धक्कादायक घटनेत इंडोनेशियातील 12 वर्षांचा मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. हा मुलगा प्रिंगसेवू रीजेंसी येथे पतंग उडवत होता. दरम्यान तो पतंगासह 30 फूट उंच उडाला. मोठ्या पतंगामुळे तो हवेत उडाला व खाली कोसळला. प्रिंगसेवू चाईल्ड प्रोटेक्शन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. जेथे त्याच्या हातात सहा ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याची पुष्टी झाली आहे, त्याला इतर अनेक जखमी झाल्या आहेत.
Boy, 12, is swept into the air by a kite after getting tangled in its strings https://t.co/ON8z5bITL6
कोकोनट जकार्ता मधील एका वृत्तानुसार, 12 वर्षाच्या मुलाच्या भावाने सांगितले की, घटनेच्या वेळी त्याचे भाऊ-बहीण पतंग उडवत होते. ऑगस्टमध्ये अशाच एका घटनेत एक 3 वर्षांची मुलगी एका मोठ्या पतंगाच्या तारेत अडकली होती. तैवानच्या नान्टेलियो या पतंगोत्सवात ही घटना घडली होती. ही मुलगी पतंग पकडून उभी होती. तेव्हा वाऱ्यामुळे पतंग उडाला व यासोबत मुलगीही काही अंतरापर्यंत उडाल्याची घटना घडली होती.