ट्रायपोली, 14 मे : एखादं प्लेन क्रॅश झालं तर त्यातून कुणी वाचणं अशक्यच. अशाच भयंकर विमान दुर्घटनेत शेकडो लोकांचा जीव गेला पण यातून एक चिमुकला मात्र एकटाच बचावला. विमान अपघातातून हा चिमुकला बचावणं म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. या चिमुकल्याला आता देवदून म्हटलं जातं आहे
(9 Year old child sole survivor in plane crash).
रुबेन वन असौ असं या मुलाचं नाव आहे. 103 लोकांचा मृत्यू झालेल्या विमान दुर्घटनेतून हा 9 वर्षांचा चिमुकला वाचला आहे. त्याने मृत्यूलाही मात दिली आहे. लीबियाच्या ट्रायपोली एअरपोर्टवर विमानावर प्लेन क्रॅश झालं, त्या विमानात हा मुलगा होता.
12 वर्षांपूर्वी घडलेली ही दुर्घटना. लिबियात 12 मे 2010 साली विमान अपघात झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गहून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. लीबियामध्ये ते क्रॅश झालं. एअरपोर्टच्या रन-वेजवळच हे विमान क्रॅश झालं होतं. विमान जमिनीवर धडकणार त्याआधीच हा मुलगा विमानातून बाहेर पडला. तो बाहेर आला आणि लगेच प्लेन जमिनीवर आदळलं आणि मोठा ब्लास्ट झाला. विमानाचे तुकडेतुकडे झाले. या दुर्घटनेत या मुलाच्या आई-वडिलांचीही मृत्यू झाला आहे.
हे वाचा - कपडे काढून वॉटरफॉलखाली झोपला, अचानक कोसळला साप आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO
उपचारादरम्यान त्याला तो कुठला असल्याचं विचारलं तेव्हा त्याने हॉलँडचा असल्याचं सांगितलं. अशा भयंकर विमान अपघातातून बचावलेला हा मुलगा चौदावी व्यक्ती आहे. त्याचे पाय मोडले पण त्याचा जीव वाचला. त्याचे नातेवाईक त्याची काळजी घेत आहेत. तिलबुर्गच्या योरे एलिमेंट्री स्कूलमध्ये त्याने शिक्षण पूर्ण केलं. आता तो सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा आकाश स्वच्छ होतं. सर्वकाही नीट दिसत होतं. त्यामुळे वातावरणामुळे ही दुर्घटना होऊच शकत नाही. यामागे दहशतवाद्यांचा कट असल्याचं सांगितलं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.