Home /News /videsh /

अरे बापरे! दोन महिन्यांच्या बाळाला देणार 16 कोटींचं इंजेक्शन, वाचा त्याला कोणता आहे गंभीर आजार

अरे बापरे! दोन महिन्यांच्या बाळाला देणार 16 कोटींचं इंजेक्शन, वाचा त्याला कोणता आहे गंभीर आजार

ब्रिटनमधल्या (Britain) आठ आठवड्याच्या म्हणजेच फक्त दोन महिन्यांच्या मुलाला जगातले सर्वात महाग इंजेक्शन ( Injection) देण्यात येणार आहे. या इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी आहे.

    लंडन, 17 डिसेंबर :  लहान मुल जन्मताच त्याला एखादा आजार असणं यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही. जन्मजात मुलाचा जीव अत्यंत नाजूक असतो. त्यामुळे त्यांचे आजारपणही अनेकदा गुंतागुतीचे होते. ब्रिटनमधल्या (Britain) आठ आठवड्याच्या म्हणजेच फक्त दोन महिन्यांच्या मुलाला जगातले सर्वात महाग इंजेक्शन ( Injection) देण्यात येणार आहे. या इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी आहे. मुलाला कोणता आजार आहे? एका इंजेक्शनची किंमत 16 कोटी हे वाचल्यानंतरच तुम्हाला त्या बाळाला कोणता आजार आहे? हा प्रश्न पडला असेल. त्या लहान बाळाला झालेल्या आजाराचं नाव आहे Genetic Spinal Muscular Atrophy (SMA)  हा एक जगातील खतरनाक आजार मानला जातो. या आजारावरील उपचार हे कॅन्सरपेक्षाही महागडे आहेत. या रुग्णांच्या शरीरात एसएमएन -1 (SMN -1) जिन्सची कमतरता असते. या रुग्णांच्या छातीमधील स्नायू कमकुवत असतात. त्यामुळे त्यांना श्वास घेताना मोठा त्रास होतो. लहान मुलांमध्येच या आजाराचं प्रमाण जास्त आहे. हा आजार बळावल्यास मुल दगावण्याची देखील शक्यता असते. ब्रिटनमध्ये या आजाराचे रुग्ण सर्वात जास्त आहेत. ब्रिटनमध्ये दरवर्षी 60 मुलांना जन्मत: हा आजार असतो. इतके महागडे इंजेक्शन का? ब्रिटनमधल्या मुलांना हा आजार होत असला तरी त्याचे औषध ब्रिटनमध्ये मिळत नाहा. या आजारावरील इंजेक्शनचे नाव आहे झोलगेनेस्मा. (Zolgensma) हे इंजेक्शन अमेरिका, जर्मनी आणि जपानमधून मागवण्यात येते. या आजाराने पीडित असलेल्या रुग्णाला फक्त एकदाच हे इंजेक्शन देण्यात येते. त्यामुळेच हे इतके महाग आहे. या आजारावर तीन वर्षांपूर्वी कोणतेही उपचार नव्हते. भरपूर संशोधन आणि टेस्टिंग केल्यानंतर 2017 मध्ये यावरील औषध शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले. त्यानंतर या इंजेक्शनची निर्मिती सुरु झाली. ब्रिटनमधल्या एडवर्ड या दोन महिन्यांच्या मुलाला हे इंजेक्शन देण्यात येणार आहे. त्याच्या पालकांनी लोकसहभागातून ( Crowd Funding) या इंजेक्शनसाठी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास दोन कोटी रुपये जमवले असून उर्वरित रक्कम जमा होण्यासाठी जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी पुढं यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या