एका क्षणात कुटुंब उद्धवस्त; 7 जणांचा भीषण अपघातात मृत्यू, CCTVमध्ये कैद झाला थरार

एका क्षणात कुटुंब उद्धवस्त; 7 जणांचा भीषण अपघातात मृत्यू, CCTVमध्ये कैद झाला थरार

33 सेकंदात अख्खं कुटुंब उद्धवस्त झालं, आजोबांपासून, लेकींसह 3 नातवांचाही अपघाती मृत्यू.

  • Share this:

कॉस्टा रिका, 18 सप्टेंबर : भारतातच नव्हे तर परदेशातही अपघातांचे प्रमाण वाढत आहे. मात्र मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका येथील कार्टोगो शहरात एक भयंकर अपघात घडला. या अपघातात एकाच घरातल्या सात जणांचा मृत्यू झाला. हा अपघात व्हॅन आणि पोलीस ट्रक यांच्यात झाला. हा अपघात इतका भीषण होता की रुग्णालयात घेऊन जाण्याआधीच घरातल्या सातही जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.

या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये पोलिसांची गाडी जवळच्या एक परिसरात आपतकालीन परिस्थितीमुळे जात असतानाच समोरून येणाऱ्या व्हॅनची टक्कर झाली. या अपघाता 70 वर्षीय आजोबा, 43, 32 आणि 30 वर्षांच्या तीन महिला. 16, 13 आणि 11 वर्षांच्या मुलांचा समावेश होता.

वाचा-संसार फुलायला सुरुवात झाली अन् काळाने घातला पती-पत्नीवर घाला

वाचा-पुलावरून थेट बाईकसह नदीत बुडालं कुटुंब, नेमकं काय घडलं पाहा थरारक VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब घरी जात असताना हा अपघात झाला. सातही जणं फूटबॉलचा सामना पाहून आपल्या घरी येत होते, त्यावेळी हा अपघात झाला. अवघ्या काही अंतरावर त्याचं घर असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि काही सेकंदात संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं. त्यांच्या घरातील एक व्यक्ती त्यांना जवळून जात असताना त्यानं हा अपघात पाहिला.

वाचा-...आणि थेट गाडीसमोर आलं 'भूत', पर्यटकांची काय झाली अवस्था पाहा VIDEO

या अपघातात पोलिसांच्या ट्रकमध्ये असलेले ऑफिसरही जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात कसा घडला, याची चौकशी केली जात आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 18, 2020, 9:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या