मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बॉम्बस्फोटांनी हादरलं काबूल विमानतळ; 60 जणांचा मृत्यू, आतापर्यंत नेमकं काय घडलं?

बॉम्बस्फोटांनी हादरलं काबूल विमानतळ; 60 जणांचा मृत्यू, आतापर्यंत नेमकं काय घडलं?

या हल्ल्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू (60 Killed in Kabul Blast) झाला आहे तर 140 जण जखमी असल्याचं वृत्त आहे

या हल्ल्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू (60 Killed in Kabul Blast) झाला आहे तर 140 जण जखमी असल्याचं वृत्त आहे

या हल्ल्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू (60 Killed in Kabul Blast) झाला आहे तर 140 जण जखमी असल्याचं वृत्त आहे

  • Published by:  Kiran Pharate
काबूल 27 ऑगस्ट : अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथे गुरुवारी तेच घडलं ज्याची भीती होती. काबूल विमानतळाजवळ गुरुवारी दोन आत्मघाती बॉम्बस्फोट झाले (Explosion outside Kabul Airport). बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू (60 Killed in Kabul Blast) झाला आहे तर 140 जण जखमी असल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात तीन अमेरिकी सैनिकही जखमी झाले आहेत. सर्वात आधी पेंटागननं दोन्ही विमानतळावर झालेल्या हल्ल्यांची माहिती दिली. काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ल्याचा पहिला VIDEO आला समोर काबुल विमानतळाबाहेर झालेल्या या बॉम्बस्फोटाच्या 24 तास आधीच अमेरिकेनं याठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती. 25 ऑगस्टलाच अमेरिकेनं एक अॅडव्हायजरी जारी करुन अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना विमानतळावरुन शक्य तितक्या लवकर दूर जाण्यास सांगितलं होतं. मात्र गुरुवारी ज्याची भीती होती तेच घडलं. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची तालिबानकडून दखल, सहा दिवसांनी दिलं प्रत्युत्तर देशाबाहेर पलायनासाठी काबूल विमानतळावर हजारोंनी गर्दी केलेली आहे. अशातच याठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यातील पहिला बॉम्बस्फोट काबूल विमानतळाच्या एबी गेटजवळ झाला. तर दुसरा विमानतळाबाहेरील एका हॉटेलजवळ झाला. या स्फोटांमुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. या घटनेत 12 अमेरिकी कर्मचारी ठार झाल्याचं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अफगाणिस्तानातील ISIS संलग्न संघटनेनं (ISIS -K) हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोबतच हा हल्ला अमेरिकी सैन्याच्या नियंत्रणाखालील झाल्याचं तालिबाननं म्हटलं आहे. सर्वात आधी अशी बातमी समोर आली की काबूल विमानतळावर स्फोट झाला आहे, मात्र मृतांची आणि जखमींचा संख्या सांगितली गेली नाही. नंतर पेंटागनंही याची पुष्टी केली. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव जॉन किर्बी म्हणाले, की पहिला स्फोट विमानतळाच्या गेटवर झाला. तर यानंतर दुसरा स्फोट विमानतळाच्या जवळ असलेल्या हॉटेल बरूनजवळ झाला. इथे ब्रिटन सैनिक थांबलेले होते. रशियन माध्यमांनुसार, या हल्ल्यात 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये अमेरिकन सैन्याचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर विमानतळावरील सर्व ऑपरेशन बंद आहेत. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, विमानतळाच्या बाहेर तीन संशयित दहशवतवादी दिसले. यातील दोघं सुसाईड बॉम्बर होते तर एकाकडे हत्यारं होती. यूनायटेड किंगडमच्या संरक्षण मंत्रालयानंही या घटनेची पुष्टी केली आहे. स्फोटानंतर विमानतळावर गोंधळ उडाला आहे. स्फोटानंतर अमेरिकेच्या दूतावासानं अलर्ट जारी केला आहे. लोकांना विमानतळाकडे न जाण्याचा सल्ला दिला गेला आहे. विमानतळावर असलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना त्वरित बाहेर पडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांनी म्हटलं, की काबूल विमानतळावर देश सोडण्यासाठी उभा असलेल्या लोकांवर हल्ला झाला. या लोकांना शांती हवी होती. मात्र, त्यांच्यावर हल्ला झाला. विमानळाच्या बाहेर झालेल्या हल्ल्याची तालिबाननं निंदा केली. तालिबाननं म्हटलं, की विमानतळाची सुरक्षा अमेरिकेच्या हातात होती.
First published:

Tags: Afghanistan, Taliban

पुढील बातम्या