सीरियामधल्या रासायनिक हल्ल्यात 58 मृत्युमुखी, लहान मुलांचाही समावेश

सीरियामधल्या रासायनिक हल्ल्यात 58 मृत्युमुखी, लहान मुलांचाही समावेश

सीरियामधल्या खान शैखौन या बंडखोरांनी ताबा घेतलेल्या शहरावर हा हल्ला

  • Share this:

04 एप्रिल : सीरियामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्यात 58 जणांचा मृत्यू ओढवलाय. यामध्ये बहुतांश मुलांचा समावेश आहे. हा हल्ला रासायनिक अस्त्रांद्वारे केला असावा, असा संशय आहे.

सीरियामधल्या खान शैखौन या बंडखोरांनी ताबा घेतलेल्या शहरावर हा हल्ला झालाय. सीरियाचं सरकार किंवा रशियाच्या जेट विमानांनी हा हल्ला केला असावा, असं सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स या संस्थेने म्हटलंय. या विमानांनी केलेल्या हल्ल्यामुळे इथल्या रहिवाशांचा मृत्यू ओढवला. या हल्ल्यात बचावलेल्या लोकांवर उपचार करणाऱ्या आरोग्य केंद्रांवरही रॉकेटने हल्ला झालाय.

असं असलं तरी रासायनिक हल्ला झाल्याच्या वृत्ताचा सीरियन लष्कराने इन्कार केलाय. त्याबरोबरच रशियन सरकारनेही, आम्ही अशा प्रकारचे हल्ले केलेले नाहीत, असं म्हटलंय. पण रासायनिक हल्ला झाल्याचं स्पष्ट झालं तर सीरियामधल्या यादवीच्या काळातला हा सर्वात भीषण हल्ला असणार आहे.

सीरियामधल्या इडलिब शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या खान शैखौन या बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या शहरावर रात्री हा हल्ला झाला. काही पत्रकार आणि छायाचित्रकार हल्ल्याच्या ठिकाणी गेले तेव्हा तिथले रहिवासी जमिनीवर पडले होते. लहान मुलांचा श्वास कोंडल्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागत होतं. या परिस्थितीमुळेच हा हल्ला रासायनिक अस्त्रांद्वारे केल्याचा संशय आहे.

First published: April 4, 2017, 9:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading