Home /News /videsh /

'तो माझ्या बाजुला बसतो...' Google मध्ये महिला कर्मचाऱ्याची छळणूक, 500 कर्मचाऱ्यांचं सुंदर पिचाईंना पत्र

'तो माझ्या बाजुला बसतो...' Google मध्ये महिला कर्मचाऱ्याची छळणूक, 500 कर्मचाऱ्यांचं सुंदर पिचाईंना पत्र

गुगलमध्ये इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या एमी नेटफील्ड (Emi Nietfeld) यांनी 'द न्यूयार्क टाइम्स' (The New York Times) मध्ये लिहिलेल्या ओपिनियन पीसमध्ये याबाबत भाष्य केलं.

    नवी दिल्ली, 11 एप्रिल: दिग्गज टेक कंपनी गुगल (Google) आणि अल्फाबेट (Alphabet) चे सीईओ सुंदर पिचाई (Sunder Pichai) यांना कंपनीच्या 500 कर्मचाऱ्यांनी पत्र लिहून ऑफिसमध्ये सुरू असणाऱ्या छळणुकीबाबत (Harassment) तक्रार केली आहे. या पत्रातून छळणुकीला सहारा न देण्याचं आणि शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण तेव्हा प्रकाशझोतात आलं जेव्हा गुगलमध्ये इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या एमी नेटफील्ड (Emi Nietfeld) यांनी 'द न्यूयार्क टाइम्स' (The New York Times) मध्ये लिहिलेल्या ओपिनियन पीसमध्ये याबाबत भाष्य केलं. त्यांनी असा आरोप केला होता की, त्यांना अशा एका व्यक्तीबरोबर एकापाठोपाठ एक मीटिंग करण्यास भाग पाडलं जायचं जो त्यांना त्रास देत असे. एमी यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर हे प्रकरण पुढे आलं आहे. एमी पुढे म्हणाल्या... एमी यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे की, मला त्रास देणारा तो माणूस आता देखील माझ्या बाजुला बसतो. माझ्या मॅनेजरने मला असं सांगितलं ती एचआर द्वारे त्यांना डेस्क न बदलण्याचे सांगण्यात आले, किंवा घरून काम करण्याचा अथवा सुट्टी घेण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान एमी यांच्या वक्तव्यावर अद्याप गुगलकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही आहे, शिवाय कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही आहे. (हे वाचा-'या' खेळाडूच्या खळबळजनक कबुलीनंतर क्रिकेट विश्वात झाला होता भूकंप) कर्मचाऱ्यांनी लिहिलं पत्र गुगलच्या कर्मचाऱ्यांनी सुंदर पिचाई यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की अल्फाबेटच्या 20 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर देखील अल्फाबेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. छळणुकीनंतर तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच भार सहन करण्यासाठी मजबूर केलं जात आहे. ज्यानंतर ज्याला त्रास झाला ती व्यक्ती ऑफिस सोडून निघून जाते पण दोषी व्यक्ती तिथेच राहतो किंवा त्याच्या अशा वागण्याला पुरस्कृत केलं जातं. त्यांनी असं लिहिलं आहे की अल्फाबेटचे कर्मचारी छळणूक मुक्त वातावरणात काम करू इच्छितात. पीडित व्यक्तींची काळजी घेण्यास प्राथमिकता देऊन कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या