Home /News /videsh /

ट्रकच्या आतमध्ये आढळले 46 जणांचे मृतदेह; चालक फरार, धक्कदायक घटनेनं अमेरिकेत खळबळ

ट्रकच्या आतमध्ये आढळले 46 जणांचे मृतदेह; चालक फरार, धक्कदायक घटनेनं अमेरिकेत खळबळ

स्काय न्यूजने राज्याचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी पुष्टी केल्याचं सांगत म्हटलं की लॉरीमध्ये किमान ४६ लोक मृतावस्थेत आढळले. इतर 16 जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं.

    वॉशिंग्टन 28 जून : अमेरिकेतील टेक्सास राज्यातील सेंट अँटोनियो शहरात ट्रकच्या आतमध्ये ४६ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे (46 People Found Dead Inside a Truck). स्काय न्यूजने राज्याचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी पुष्टी केल्याचं सांगत म्हटलं की लॉरीमध्ये किमान ४६ लोक मृतावस्थेत आढळले. इतर 16 जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. अनेक सॅन अँटोनियो पोलीस वाहने, तसंच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत. अतिउष्णतेमुळे ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. Nagpur Crime : नागपूर हादरलं, जावायानं मध्यरात्री केली सासू-सासऱ्यांची हत्या स्थानिक टीव्ही चॅनलच्या रिपोर्टनुसार, सॅन अँटोनियोमध्ये रेल्वे ट्रॅकजवळ एक संशयास्पद ट्रक उभा असल्याचं आढळून आलं. वाहनाची झडती घेतली असता अनेक मृतदेह सापडले. वाहन चालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. अँटोनियो अमेरिका-मेक्सिको सीमेपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेतील एका नाईट क्लबमध्ये २१ विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले होते. हायस्कूलच्या परीक्षा संपल्यानंतर मृत मुलं आनंदोत्सव साजरा करण्यासाठी क्लबमध्ये गेली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या मुलांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. 32 वर्षीय तरुणाची 12 लग्नं; प्रेमाच्या जाळ्यात ओढून आधी विवाह, मग करायचा धक्कादायक कृत्य या घटनेत ठार झालेल्या विद्यार्थ्यांचं वय १३ ते १७ वर्षे असल्याचं सांगण्यात आलं. ब्रिगेडियर थेंबिन्कोसी किनाना म्हणाले होते- 'आम्हाला माहिती मिळाली आहे की दक्षिण आफ्रिकेतील सीनरी पार्कजवळील नाईट क्लबमध्ये 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 8 मुली आणि 13 मुलांचे मृतदेह सापडले आहेत. क्लबच्या आतून 17 मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. उपचारादरम्यान 4 मुलांचा मृत्यू झाला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: America, Dead body

    पुढील बातम्या