Home /News /videsh /

जेव्हा स्मॉगमुळे लंडनमध्ये बरेच दिवस पसरला होता काळोख, पटापट झाले होते मृत्यू

जेव्हा स्मॉगमुळे लंडनमध्ये बरेच दिवस पसरला होता काळोख, पटापट झाले होते मृत्यू

4 डिसेंबर 1952 ही लंडनसाठी एक अशी तारीख आहे जी शहरासाठी काळ बनून आली होती. बघताबघता लंडनवर काळोखाची चादर पसरली होती. लोक पटापट मरत होते. दिवसा अंधार होण्याचे कारण होते स्मॉग, ज्याला आजही द ग्रेट स्मॉग ऑफ लंडन (The Great Smog of London) या नावाने ओळखले जाते.

पुढे वाचा ...
    लंडन : 4 डिसेंबर 1952 ही लंडनसाठी एक अशी तारीख आहे जी शहरासाठी काळ बनून आली होती. बघताबघता लंडनवर काळोखाची चादर पसरली होती. लोक पटापट मरत होते. दिवसा अंधार होण्याचे कारण होते स्मॉग, ज्याला आजही द ग्रेट स्मॉग ऑफ लंडन (The Great Smog of London) या नावाने ओळखले जाते. 4 डिसेंबर 1952 ही तारीख आजही लंडनसाठी एक भयावह तारीख आहे. या दिवशी शहरात अचानक काळोख झाला होता. लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. लोकांचा श्वास गुदमरू लागला. घराबाहेर पडणंही खूप धोकादायक झाले होते. हॉस्पिटलबाहेर गर्दी झाली होती. बाहेर पडताच लोक पटापट मरत होते. द ग्रेट स्मॉग ऑफ लंडनने 15 हजार लोकांचा जीव घेतला असे सांगितले जाते. या काळ्या स्मॉगमुळे लंडनचे लोक हादरले होते. यापूर्वी इतके वायुप्रदूषण तिथे कधीच दिसले नव्हते. डिसेंबरमध्ये फक्त स्मॉगची चादर पसरली नव्हती तर कडाक्याची थंडीही पडली होती. वाऱ्याची झुळुकही नव्हती, त्यामुळे सगळीकडे वायुप्रदूषण झाले होते. हा स्मॉग आला तो कोळशाच्या वापरामुळे, ज्याने संपूर्ण शहरावर दाट काळ्या धुक्याची चादर पसरली. ते पाच दिवस 4 डिसेंबरला सुरू झालेला हा स्मॉग एक दोन दिवस नाही तर पुढील पाच दिवस तसाच होता. हवामानात बदल झाल्यावर तो नाहीसा झाला. फक्त बाहेरच नाही, तर घरामध्ये बंद दाराआडही सगळं धुसर दिसत होतं. एक लाखाहून जास्त लोक आजारी पडले सरकारचे मेडिकल अहवाल पुढील काही आठवडे या संकटबद्दलच बोलत होते. असा अंदाज आहे की, 8 डिसेंबर 1952 पर्यंत चार दिवसांत यामुळे चार 4,000 लोक मरण पावले. स्मॉगमुळेच त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. एक लाखाहून अधिक लोक यामुळे आजारी पडले. लोकांच्या मज्जासंस्थेवर आणि फुफ्फुसांवरही याचा परिणाम झाला. श्‍वसनाचे आणि घशाचे आजार निर्माण झाले. डोळ्यांची आग व्हायला सुरुवात झाली. नंतर झालेल्या संशोधनातून असे समोर आले की, यामुळे सहा हजार पेक्षा जास्त लोक मरण पावले आणि एक लाखापेक्षा जास्त लोक स्मॉगमुळे आजारी पडले होते. याचा परिणाम पुढेही काही महिने चालू होता. किंग एडवर्डने कोळसा जाळण्यावर बंदी आणली लंडनमध्ये तेराव्या शतकापासून वायुप्रदूषण सुरू झाले होते. यामुळेच 1301 मधे एडवर्ड प्रथम याने लंडनमध्ये कोळसा जाळण्यावर बंदी घातली होती. सोळाव्या शतकापर्यंत हवा दूषित झाली होती. पण ग्रेट ब्रिटनच्या इतिहासातील वायू प्रदूषणाची ही सर्वात मोठी घटना होती. यानंतर जगभरात पर्यावरणावर संशोधन, सरकारचे पर्यावरण संबंधित कायदे, हवेची शुद्धता याविषयी जनजागृती होण्यास सुरुवात झाली. 1956 मध्ये ब्रिटनमध्ये पहिल्यांदा स्वच्छ हवेसाठी कायदा बनविण्यात आला. काय होते ग्रेट स्मॉगचे कारण थंडीत लंडनमधील लोक आपली घरे गरम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोळसा जाळत असत. या धुरातून मोठ्या प्रमाणात सल्फरडाय ऑक्साईड तयार होतो. लंडनमध्ये कोळशावर आधारित पावर स्टेशन सुद्धा सुरू झाले होते. त्यामुळे सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण वाढत होते. लंडनच्या हवामान खात्यानुसार, ह्या सर्व गोष्टी हवेमध्ये रोज एक हजार टन स्मोक पार्टिकल्स, 140 टन हायड्रोक्लोरिक ऍसिड, 14 टन क्लोरीन कंपाऊंड, 370 सल्फर डाय ऑक्साईड हवेत मिसळत होत्या. जे सल्फ्युरिक ॲसिडच्या रूपात हवेत 800 टन दमटपणा निर्माण करत होत्या. त्याचबरोबर वाहनांमुळे सुद्धा प्रदूषण होत होते. त्यावेळी कोळशावर आधारित ट्रेन आणि डिझेल इंधनवाली बससुद्धा चालविल्या जात असत. त्यांना नंतर इलेक्ट्रिक ट्राम सिस्टममध्ये बदलण्यात आलं. हवामान कसे होते? 4 डिसेंबरला ग्रेटर लंडनमध्ये हवेत कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. वारा कुठेच नव्हता. थंडीमुळे हवेत प्रदूषणाच्या घटकांचे थर निर्माण होत होते. गरम हवा आणि धुके यामुळे स्मॉगचा एक जाड थर तयार झाला होता. स्मॉगमध्ये लोकांच्या घरातील आणि कारखान्यांचा चिमणीतून निघणाऱ्या धुराचा ही समावेश होता. ह्या सगळ्यांचा मिळून स्मॉगचा इतका मोठा थर बनला होता की पुढील काही दिवस तो तसाच होता. काय परिणाम झाला? लंडनमध्ये धुकं पडणं ही काही नवीन गोष्ट नव्हती, पण हे धुकं दाट आणि बराच काळ राहिले होते. यामुळे पारदर्शकपणा कमी झाला होता. या काळात केवळ काही मीटर पर्यंतच दिसत होते. लोकांना आंधळं झाल्यासारखं वाटत होतं, तसंच गाडी चालवणे अशक्य झाले होते. या स्मॉगमुळे सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आली होती. पण लंडन अंडरग्राउंड सेवा चालू होती. सरकारने ऍम्ब्युलन्सही बंद केल्यामुळे नागरिकांना स्वत: रुग्णालयात जावे लागणार होते. स्मॉग इतका दाट होता की तो लोकांच्या घरात शिरला होता. यामुळे सार्वजनिक कार्यक्रम आणि चित्रपटांचं शूटिंग, मैदानी खेळसुद्धा रद्द करण्यात आले होते. या पाच दिवसांमध्ये लोकांना घरातून बाहेर पडणंही अवघड झालं होतं. रात्रीच्या वेळची परिस्थिती तर आणखी गंभीर होती. त्यावेळी स्मॉग मास्क खूप महाग असल्यामुळे सर्वसामन्यांना ते विकत घेणंही परडवणारं नव्हतं. आरोग्यावर परिणाम स्मॉग पसरला तेव्हा लंडनमध्ये कोणीच घाबरले नव्हते, परंतु जेव्हा आकडे समोर आले, तेव्हा कळले की या विषारी स्मॉगमुळे 4 हजार लोकांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये बरेच लोक तरुण आणि वृद्धही होते. मार्कस लिप्टन यांनी 1953 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सांगितले की, या फॉगर्मुळे 6 हजार लोकांचा जीव गेला आणि 2,500 पेक्षा अधिक लोक आजारी पडले. नुकत्याच झालेल्या संशोधनातून असे कळले की, या भयावह स्मॉगमुळे 12 हजार लोकांचा बळी घेतला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या