आइसलँडमध्ये बनतंय थ्रीडी झेब्रा क्राॅसिंग

आइसलँडमध्ये बनतंय थ्रीडी झेब्रा क्राॅसिंग

दिल्लीत राजाजी मार्गावर थ्रीडी झेब्रा क्राॅसिंग बनवलंय. आणि आता आइसलँड देशातही थ्रीडी झेब्रा क्राॅसिंग बनतंय.

  • Share this:

28 आॅक्टोबर : लोकांनी रहदारीचे नियम पाळावेत म्हणून सगळेच देश त्यांच्या परीनं प्रयत्न करत असतात. काही देशात तर हे नियम खूपच कडक आहेत. पण तरीही अनेकदा नागरिक रहदारीचे नियम मोडत असतात. मग त्यासाठी सरकारला वेगवेगळ्या शकली लढवाव्या लागतात. दिल्लीत राजाजी मार्गावर थ्रीडी झेब्रा क्राॅसिंग बनवलंय. आणि आता आइसलँड देशातही थ्रीडी झेब्रा क्राॅसिंग बनतंय.

अनेक गाड्या झेब्रा क्राॅसिंगवरही वेगानं जातात. त्यांना या थ्रीडी झेब्रा काॅसिंगमुळे लगाम बसेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सध्या आइसलँडमध्ये लोक या थ्रीडी झेब्रा क्राॅसिंगवर जाऊन सेल्फी काढतायत. अर्थात, यामुळे वाहनांचा वेग कमी झाला आणि रहदारीचे नियम पाळले गेले, म्हणजे मिळवले.

First published: October 28, 2017, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading