इराण-इराक सीमेवर भूकंप; 328 जणांचा मृत्यू

इराण-इराक सीमेवर भूकंप; 328 जणांचा मृत्यू

आतापर्यंत 140 जणांचा या भुकंपात मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

13 नोव्हेंबर: इराण-इराक सीमेवरील परिसर रविवारी रात्री भूकंपाने हादरला आहे. आतापर्यंत 328  जणांचा या भूकंपात मृत्यू झाला आहे. तर 1700 लोकं गंभीर जखमी झाले आहेत.

या भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्टर स्केल इतकी होती. कुर्दीस्तानपासून जवळ असलेल्या पेंजविन परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. इराकच्या उत्तरेकडील भाग आणि राजधानी बगदादला सर्वाधिक फटका बसला. इराण सीमेवरील गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. इराणमधील एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, देशातील १४ राज्यांना भूकंपाचा तडाखा बसला आहे. या सर्व राज्यांमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा अधिकाऱ्यांनी केली आहे. गेल्या 13 वर्षात इराणमध्ये झालेला सगळ्यात मोठा भुकंप आहे. याआधी २००३मध्ये भुकंपात २६ हजार लोक मृत्युमुखी पडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 11:28 AM IST

ताज्या बातम्या