5 दिवसांच्या 'सेक्स पार्टी'मध्ये 300 जण सामिल; अनेकांना कोरोनाची लागण

5 दिवसांच्या 'सेक्स पार्टी'मध्ये 300 जण सामिल; अनेकांना कोरोनाची लागण

'असं काही होईल याची कल्पना असती, तर ही पार्टी मी कधीही ऑर्गेनाईज केली नसती. इव्हेंट केल्यानंतर आता याबद्दल मला सतत त्रास होत असून सर्व काही ठिक होत नाही तोपर्यंत माझी अशीच स्थिती राहील', असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 8 डिसेंबर : एका 'सेक्स पार्टी' इव्हेंटनंतर 41 लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली आहे. यात इव्हेंटमध्ये जवळपास 300 लोक एकत्र आले होते. या इव्हेंटच्या फाउंडरने, पार्टीआधी कोरोना व्हायरसच्या सुरक्षेसाठी जबरदस्त तयारी करण्यात आली होती. परंतु पार्टीनंतर अनेकांनी मेसेज करून कोरोनाची लागण झाल्याचं सांगितल्यानंतर, कुठे ना कुठे तयारी अपुरी ठरल्याचं म्हणत त्यांनी दुख: व्यक्त केलं आहे.

अमेरिकेतील न्यू ओरलिएन्समध्ये नोव्हेंबर महिन्यात 'नॉटी इन नॉलिन्स' (Naughty in N'awlins') नावाच्या इव्हेंटमध्ये 41 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या इव्हेंटचे सीईओ आणि फाउंडर बॉब हॅनफोर्ड यांनी आपल्या इव्हेंटमधील लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दुख: व्यक्त केलं आहे. यात पार्टीत आलेल्या त्यांच्या एका खास मित्रालाही लागण झाली असून त्याची स्थिती गंभीर आहे, अशी माहिती बॉब यांनी आपल्या एका ब्लॉगमध्ये लिहिली आहे.

'असं काही होईल याची कल्पना असती, तर ही पार्टी मी कधीही ऑर्गेनाईज केली नसती. इव्हेंट केल्यानंतर आता याबद्दल मला सतत त्रास होत असून सर्व काही ठिक होत नाही तोपर्यंत माझी अशीच स्थिती राहील', असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच या इव्हेंटसाठी कोरोना गाईडलाईन्सचं पालन केलं होतं आणि व्हायरसपासून बचावासाठी कठोर बंदोबस्तही केल्याचं त्यांनी सांगितलं.

(वाचा - 8 इंचाच्या अजगराला घरी घेऊन आली व्यक्ती; पाहता पाहता झाला 18 फूट VIDEO VIRAL)

सर्व लोक येण्यापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. इव्हेंट दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात होतं. लोकांनी मास्क लावले होते. केवळ खाण्या-पिण्यावेळी मास्क न लावण्याची परवानगी होती. सॅनिटायजरची सोय करण्यात आली होती. शहरातील कोरोना गाईडलाईन्सनुसार, इव्हेंटमध्ये डान्स फ्लोअरची व्यवस्थाही केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

(वाचा - घर भाड्याने देऊन वर्ल्ड टूरवर गेली महिला; भाडेकरुने घरातूनच कोटींनी मिळवलं उत्पन)

बॉब यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय की, ज्यावेळी काही लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं समजलं, त्यावेळी त्यांना, ते इव्हेंटदरम्यान कुठे फिरले, कोणत्या भागात गेले होते, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र अनेकांनी पहिल्या दोन दिवसांत सतर्कता बाळगली, त्यानंतर पाच दिवस चालणाऱ्या या इव्हेंटमध्ये शेवटी-शेवटी सावधगिरी बाळगली नसल्याचं सांगितलं. पहिले दोन दिवस सर्वांनी कोरोना गाईडलाईन्सचं पालन केलं, परंतु पाच दिवसांच्या या इव्हेंटमध्ये शेवटच्या दिवसांत लोकांनी निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे कोरोना पसरल्याचं बॉब यांनी म्हटलंय.

वेबसाईट नोलाच्या रिपोर्टनुसार, यावर्षी इव्हेंट गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिशय लहान होता. इव्हेंट लहान असूनही तो घातक ठरला. 2019 मध्ये या इव्हेंटमध्ये 2000 लोक सामिल होते. यावर्षी केवळ 300 लोक होते.

Published by: Karishma Bhurke
First published: December 8, 2020, 1:29 PM IST

ताज्या बातम्या