काबूल,ता.22 एप्रिल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज झालेल्या आत्मघाती स्फोटात 31 नागरिक ठार झाले तर 54 जण गंभीर जखमी झाले.
अफगाणिस्तानमध्ये ऑक्टोबंर महिन्यात निवडणूका होणार असून त्यासाठी सध्या मतदान नोंदणी सुरू आहे. अशाच एका मतदान केंद्राच्या बाहेर हा स्फोट झाला.
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्याच वेळी एका आत्मघातकी हल्लेखोरानं रस्त्यात गर्दीच्या ठिकानी उभं राहून स्वत:ला उडवून दिल्याची माहिती काबूलचे पोलीस प्रमुख दाऊद अमीन यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.