मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Shocking! 15 वर्षीय विद्यार्थ्याकडून शाळेत गोळीबार; 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 8 जण जखमी

Shocking! 15 वर्षीय विद्यार्थ्याकडून शाळेत गोळीबार; 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 8 जण जखमी

आरोपीने सुमारे 15 ते 20 राउंड फायर केल्याचं समजलं आहे. या विद्यार्थ्याने बॉडी आर्मर घातलं नव्हतं. तसंच यात त्याचा आणखी कोणी साथीदार सहभागी नव्हता

आरोपीने सुमारे 15 ते 20 राउंड फायर केल्याचं समजलं आहे. या विद्यार्थ्याने बॉडी आर्मर घातलं नव्हतं. तसंच यात त्याचा आणखी कोणी साथीदार सहभागी नव्हता

आरोपीने सुमारे 15 ते 20 राउंड फायर केल्याचं समजलं आहे. या विद्यार्थ्याने बॉडी आर्मर घातलं नव्हतं. तसंच यात त्याचा आणखी कोणी साथीदार सहभागी नव्हता

    वॉशिंग्टन 01 डिसेंबर : अमेरिकेत शाळांमध्ये गोळीबार होण्याच्या घटना वारंवार होताना दिसून येतात. अशीच एक घटना आता मिशिगनमध्येही (Michigan school shootout) झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी (30 नोव्हेंबर) ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये (Oxford high school shooting) 15 वर्षांच्या एका विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. एका शिक्षकासह आठ जण जखमी (3 killed in Michigan school firing) झाले. गोळीबार करणारा विद्यार्थीही त्याच शाळेत शिकत होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मृत विद्यार्थ्यांमध्ये 16 वर्षांचा एक मुलगा आणि 14 व 17 वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांवर शस्त्रक्रिया पार पडली आहे, तसंच अन्य सहा जणांची प्रकृती स्थिर (Michigan School firing) आहे. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि कित्येक काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    आरोपीने सुमारे 15 ते 20 राउंड फायर केल्याचं समजलं आहे. या विद्यार्थ्याने बॉडी आर्मर घातलं नव्हतं. तसंच यात त्याचा आणखी कोणी साथीदार सहभागी नव्हता. हा हल्ला (Oxford school shootout) कशामुळे करण्यात आला याबाबत तपास सुरू आहे. ऑकलंड काउंटीचे अंडरशेरीफ मायकल जी. मॅककेबे यांनी याबाबत माहिती दिली. “ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला ते अंदाधुंद गोळीबाराचे बळी आहेत की जाणूनबुजून त्यांना लक्ष्य केलं गेलं याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शाळेत आणखी कोणी अडकलं आहे का याबाबत शोध घेतला जात आहे. तसंच, या प्रकरणाचा तपास सुरू आहे,” असंही ते म्हणाले.

    या घटनेची माहिती मिळताच सुमारे 25 एजन्सी आणि 60 रुग्णवाहिकांना सूचना देण्यात आली होती. तसंच, विद्यार्थ्यांच्या पालकांनाही तातडीने माहिती कळवण्यात आली. शाळेतल्या (Michigan Oxford High School) विद्यार्थ्यांना आणि त्यांना घेण्यासाठी आलेल्या पालकांना सुरक्षेसाठी जवळच्याच एका दुकानात हलवण्यात आलं होतं, अशी माहिती रोचेस्टर हिल्स फायर डिपार्टमेंटचे माहिती अधिकारी जॉन लायमॅन यांनी दिली. तसंच, या वेळी खबरदारी म्हणून आजूबाजूच्या सर्व शाळाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

    आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर शाळेच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत स्टेटमेंट जारी करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. “ऑकलंड काउंटी शेरीफ विभागाने घटनास्थळ संरक्षित केलं आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे मीटर गार्डन सेंटरमध्ये नेण्यात येत आहे. तेथून त्यांचे पालक त्यांना घरी घेऊन जाऊ शकतात. जे विद्यार्थी स्वतःच्या वाहनांनी आले आहेत, त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येत आहे,” अशा प्रकारची सूचना ऑक्सफर्ड कम्युनिटी स्कूलच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.

    दरम्यान, 2021 साली अमेरिकेतल्या शाळांमध्ये 138 वेळा गोळीबाराच्या घटना (America School firings in 2021) घडल्या. या सर्व घटनांमध्ये एकूण 26 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी झालेली घटना ही या वर्षीची सर्वांत मोठी (Deadliest school shootout in 2021) घटना होती. इतर कोणत्याही घटनेमध्ये 2 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला नव्हता, अशी माहिती एव्हरीटाउन फॉर गन सेफ्टीने दिली आहे. अमेरिकेचा इतिहास पाहता, सर्वांत मोठी स्कूल फायरिंग (Deadliest school firing in America) घटना 2007 साली झाली होती. व्हर्जिनियामधील एका शाळेत झालेल्या त्या गोळीबारात हल्लेखोरासह एकूण 33 जणांचा मृत्यू झाला होता.

    First published:
    top videos

      Tags: America, Gun firing