वॉशिंग्टन, 03 फेब्रुवारी : सध्याच्या काळात लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींच्या वयामध्ये फारसं अंतर नसतं. फार तर 4-5 वर्षांचं अंतर असू शकतं; मात्र आजोबांच्या वयाच्या पुरुषासोबत कोणी लग्न करत असेल, तर त्यात पैसा किंवा संपत्ती मिळवण्याचा हेतू असण्याची शक्यता असते. तशी शंका एका अमेरिकन दाम्पत्याच्या लग्नाबाबत वाटते. अमेरिकेतल्या 24 वर्षांच्या एका मुलीनं 85 वर्षांच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. हे अमेरिकन दाम्पत्य आता पालक बनण्याचाही विचार करत आहे. त्यासाठी IVF उपचारांची मदत घेण्याचा त्यांचा मानस आहे.
रिअल इस्टेटचा व्यवसाय करणारे 85 वर्षांचे चार्ल्स पोग्यू आणि 24 वर्षांची मिरॅकल पोग्यू यांच्या नात्यामागे पैसाच कारणीभूत असेल, अशी शक्यता व्यक्त होतेय. या दोघांची ओळख एका लाँड्रीच्या दुकानात झाली. तिथे मिरॅकल काम करत असे आणि चार्ल्स तिथे कपडे धुवायला देण्यासाठी येत असत. त्यांच्या मते, पहिल्या नजरेतच त्यांना एकमेकांविषयी ओढ वाटू लागली. मिरॅकलच्या म्हणण्यानुसार, दुकानात आल्यावर चार्ल्स यांना कपडे तिच्याच हातात द्यायची इच्छा असायची. तिलाही ते कपडे इतर कोणाच्या हातात पडू नयेत, असंच वाटायचं. त्या काळात त्या दोघांनी परस्परांना समजून घेतलं. तिच्या मते, दोघांच्या वयातलं अंतरही फारसं जाणवलं नाही. ते दोघं एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की अखेर फेब्रुवारी 2020मध्ये चार्ल्स यांनी तिला लग्नाची मागणी घातली.
हेही वाचा : न्यायाधीशांनी निकाल देण्यासाठी घेतली ChatGPTची मदत, सुनावणीवेळी विचारले प्रश्न
‘आमच्या नात्याबाबत तामिका फिलिप्स या 45 वर्षांच्या माझ्या आईला आणि 72 वर्षांचे जोए ब्राऊन या माझ्या आजोबांना जेव्हा कळालं, तेव्हा दोघांनीही मला पाठिंबा दिला,’ असं मिरॅकल सांगते. ती अमेरिकेच्या मिसिसिपी प्रांतातल्या स्टार्कविल्ले या गावात राहते. ‘एके दिवशी चार्ल्स माझ्या घरी आले व कागदाचा तुकडा माझ्यासमोर भिरकावत माझा नंबर मागितला,’ असं मिरॅकल सांगते. तेव्हा प्रेमाबद्दल मला खात्री झाली, असंही ती म्हणते.
मिरॅकल आणि चार्ल्स यांच्या वयात तब्बल 61 वर्षांचं अंतर आहे; मात्र त्यांच्यासोबत अजिबात अवघडलेपण येत नाही, असं मिरॅकल म्हणते. ते 55 वर्षांचे आहेत, की 100 वर्षांचे आहेत, याने कोणताच फरक पडत नाही, असंही तिला वाटतं. तिच्या मते, ते दोघं पहिल्यांदा भेटले तेव्हा चार्ल्स 60-70 वर्षांचे असतील असं तिला वाटतं. कारण 85 वर्षांचे असूनही त्यांचा उत्साह जबरदस्त होता. ते भरपूर अॅक्टिव्ह होते. सुरुवातीला वडिलांना हे नातं मान्य नव्हतं; पण चार्ल्सला भेटल्यावर त्यांना चार्ल्स आवडले, असं मिरॅकल सांगते.
हेही वाचा : 'भाऊ मुख्यमंत्री, वर्दी उतरवेन', Dream11मध्ये 1 कोटी जिंकलेल्याने दारु पिऊन घातला गोंधळ
चार्ल्स आणि मिरॅकल आता वंश वाढवण्याचा विचारात आहेत. त्यांना 2 मुलं हवी आहेत. त्यासाठी ते IVF क्लिनिकमध्येही जाऊन आले आहेत. वयात इतकं अंतर असूनही त्यांचं नातं सहज असल्याचं मिरॅकलला वाटतं. चार्ल्स असेपर्यंत त्यांना खूश ठेवणार असल्याचंही ती म्हणते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.