• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • बाबो! वयवर्ष 22 आणि त्याच्याकडे आहेत तब्बल अडीच कोटींची दोन घरं; तिशीपर्यंत 'इतकी' घरं घेऊन होणार रिटायर

बाबो! वयवर्ष 22 आणि त्याच्याकडे आहेत तब्बल अडीच कोटींची दोन घरं; तिशीपर्यंत 'इतकी' घरं घेऊन होणार रिटायर

वयाच्या तिशीत 10 घरांचा मालक बनून रिटायर व्हायचं, असं त्याचं स्वप्न आहे.

 • Share this:
  'माझ्या वयाच्या व्यक्ती घर खरेदी करू शकत नाहीत, असं अजिबात नाही. त्यासाठी तुम्ही ठरावीक गोष्टी ठरावीक वयातच करू शकता, या मानसिकतेतून आधी तुम्हाला बाहेर यायला हवं...' हे उद्गार आहेत ब्रिटनमधल्या (UK) 22 वर्षांच्या जोश पॅरोट (Josh Parrot) याचे. आतापर्यंत त्याने एक कोटी रुपयांहून अधिक किमतीची दोन घरं खरेदी केली असून, वयाच्या तिशीत 10 घरांचा मालक बनून रिटायर व्हायचं, असं त्याचं स्वप्न आहे. 'द सन यूके'च्या हवाल्याने 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 'असावे घरकुल अपुले छान!' हे कोणाचं स्वप्न नसतं बरं! प्राणी-पक्ष्यांपासून माणसांपर्यंत प्रत्येकालाच आपल्या हक्काचं छप्पर हवं असतं, मग ते छोटंसं का असेना! त्यासाठी माणूस जिवाचं रान करतो, आयुष्यभर राबतो, हाडाची काडं करतो आणि आपलं विश्व उभं करतो. हे सगळं होईपर्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाचं निम्मं आयुष्य संपलेलं असतं. कारण घर बांधणं किंवा खरेदी करणं ही अशी चुटकीसरशी आणि कमी खर्चात होणारी गोष्ट नसते. कष्ट तर प्रत्येक जणच करत असतो; पण प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती, नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारं वेतन किंवा उत्पन्न किती आहे, अशा अनेक बाबींवर घराचं स्वप्न कधी पूर्ण होणार ते अवलंबून असतं. काही व्यक्ती मात्र सुदैवी असतात. त्यांच्या कष्टांना नशिबाची साथ लाभते आणि कमी वयातही ते घरकुलाचं स्वप्न साकारू शकतात. ब्रिटनमधला जोश पॅरोट हा युवक त्यापैकीच एक. जोशने वयाच्या तिशीपर्यंत स्वतःची 10 घरं (Home) असावीत, असं स्वप्न पाहिलं आहे. त्यातली दोन घरं त्याने वयाच्या बाविशीपर्यंत घेतलीही आहेत. कॉलेजमध्ये असताना दोन आठवड्यांच्या कार्यानुभव तत्त्वावर त्याने रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करणं सुरू केलं.  2015मध्ये तो कोर्स पूर्ण झाल्यावर त्याने कॉलेजमधून वेळ काढून आठवड्यातून दोन दिवस नोकरी करणं सुरू केलं. आपल्या आई-वडिलांच्या मालकीच्या कंपनीत त्याने साफसफाईचं कामही (Work) केलं होतं. हे वाचा - बापरे! तरुणाने सासरच्या मंडळींसमोर स्वत:ला पेटवून घेतलं; घटनेचा भयावह VIDEO 2018मध्ये कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने पूर्ण वेळ नोकरी करायला सुरुवात केली. त्यातून जोशने 14 लाख 25 हजार रुपये बँकेत साठवले. 2020पर्यंत त्याचं वार्षिक उत्पन्न 30 लाखांवर पोहोचलं. हे सारे पैसे त्याने आपल्या घरासाठी साठवून ठेवले. बचतीच्या पैशांतून त्याने 1.1 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पहिल्या घराची खरेदी केली. तेव्हा तो फक्त 19 वर्षांचा होता. नंतर काही दिवसांनी त्याने पहिलं घर भाड्याने देऊन वयाच्या 21व्या वर्षी 1.4 कोटी रुपयांचं दुसरं घर खरेदी केलं. घराच्या रिनोव्हेशनसाठी 20 लाख रुपये खर्च येणार होता; मात्र त्यात बचत करण्यासाठी त्याने बारीकसारीक बरीच कामं स्वतःच केली. अशाच तऱ्हेने पैसे वाचवून तो आणखीही अनेक घरं विकत घेऊ इच्छितो. 10 घरांचा मालक होऊन वयाच्या तिशीतच रिटायर व्हायचं त्याचं स्वप्न आहे. कोणीही हे स्वप्न पूर्ण करू शकतं; मात्र तशी मानसिकता हवी, असं तो म्हणतो. तो म्हणतो तसं आर्थिकदृष्ट्या प्रत्येकाला शक्य नसलं, तरी त्याच्या अॅटिट्यूडमधून प्रेरणा घेण्यासारखी आहे, एवढं नक्की!
  First published: