मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बापरे! 8 वर्षांच्या मुलीच्या शरीरात अडकली 22 वर्षांची तरुणी, काय आहे प्रकरण?

बापरे! 8 वर्षांच्या मुलीच्या शरीरात अडकली 22 वर्षांची तरुणी, काय आहे प्रकरण?

जगभरात विविध प्रकारचे लोक असतात आणि त्यांच्याशीसंबंधित विचित्र परिस्थिती (Weird Condition) देखील पाहायला मिळते. अशीच काहीशी परिस्थिती या तरुणीचीही झाली आहे.

जगभरात विविध प्रकारचे लोक असतात आणि त्यांच्याशीसंबंधित विचित्र परिस्थिती (Weird Condition) देखील पाहायला मिळते. अशीच काहीशी परिस्थिती या तरुणीचीही झाली आहे.

जगभरात विविध प्रकारचे लोक असतात आणि त्यांच्याशीसंबंधित विचित्र परिस्थिती (Weird Condition) देखील पाहायला मिळते. अशीच काहीशी परिस्थिती या तरुणीचीही झाली आहे.

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : जगभरात विविध प्रकारचे लोक असतात आणि त्यांच्याशीसंबंधित विचित्र परिस्थिती (Weird Condition) देखील पाहायला मिळते. शोना रे (Shauna Rae) नावाच्या महिलेची अशीच काहीशी परिस्थिती आहे. जी तिच्यासोबत खूप विचित्र आणि त्रासदायक ठरत आहे.

लोकांना तिच्या कहाणीबद्दल (Bizzare Story of 22 Year old Girl) अनेकदा विश्वास बसत नाही. मात्र हे खरं आहे की, शोना सध्या 22 वर्षांची आहे. मात्र ती दिसताना केवळ 8 वर्षांच्या मुलीप्रमाणे दिसते. शोना रेची उंची केवळ 3 फूट 10 इंच आहे. जी एका 8 वर्षांच्या मुलीची असते. तिला पाहून लोक तिच्यासोबत लहान मुलांसारखा व्यवहार करतात. मात्र तिचं वय 22 वर्षे आहे. शोनाने TLC रियलॅटी सीरिजमध्ये येऊन आपल्या आयुष्यातील अनुभव शेअर केला आणि सांगितलं की, ती मोठ्यांप्रमाणे व्यवहार करते. मात्र लोक तिला लहानचं समजतात.

का झाली अशी अवस्था?

शोना सहा महिन्यांची असताना तिला ब्रेन कॅन्सर झाला होता. तिचा जीव वाचवण्यासाठी किमोथेरेपी ट्रीटमेंट (chemotherapy treatment) देण्यात आली. यात शोनाचा जीव वाचला, मात्र तिच्या पिट्यूटरी ग्लँडवर ( pituitary gland) परिणाम जाला आणि तिच्या ग्रोथ हॉर्मोनची निर्मिती होणँ कमी झालं. यामुळेच तिचं वय वाढत गेलं, मात्र तिचं शरीर वाढू शकलं नाही. TLC शी बोलताना शोनाने सांगितलं की, सर्वसाधारणपणे ती 22 वर्षांच्या तरुणीसारखं काम करते, मात्र लोक तिला लहान मुलीसारखी वागवतात. ती म्हणते, बारमध्ये जाणं असो वा टॅटू काढणे, ब्लाइंड डेटवर जाण्यासारख्या सामान्य गोष्टींसाठीही तिला खूप त्रास घ्यावा लागतो.

यापूर्वीही अशा घटनांची नोंद..

यापूर्वी आलेल्या वृत्तानुसार, 34 वर्षांच्या महिलेचीही अशीच काहीशी अवस्था आहे. लहानपणात तिच्या डोक्याला मारहाण झाल्यामुळे अजूनही तिची बुद्धी लहान मुलांप्रमाणेच आहे. तर एका 23 वर्षांच्या मुलीच्या पिट्यूटरी ग्लँडमध्ये त्रास होत असल्याने ती आपल्या वयापेक्षा अर्ध्या वयाची दिसते.

First published:
top videos

    Tags: Health