Home /News /videsh /

या कारणामुळं एक देश जगापेक्षा 7 वर्ष मागे, सुरू आहे 2012 वर्ष

या कारणामुळं एक देश जगापेक्षा 7 वर्ष मागे, सुरू आहे 2012 वर्ष

इथोपिया हा देश जगापेक्षा 7 वर्ष मागे आहे. त्यामुळं या देशात आलेल्या पर्यटकांचा गोंधळ होतो. इथोपियाचं कॅलेंडर जगापेक्षा 7 वर्ष 3 महिने मागे आहे.

    इथोपिया, 26 जानेवारी:  जगात 2020 वर्ष सुरू झालं. एकविसाव्या शतकाकडे जगाची वाटचाल सुरू झाली आहे.  दिवसेंदिवस नवं नवे शोध लागून जग अधिकाअधिक प्रगती करतंय. प्रत्येक देशात नवं नवं तंत्रज्ञान विकसित होतंय. मात्र आजही अफ्रिकेतील एक देश जगापेक्षा पुष्कळ मागे आहे. इथोपिया हा देश जगापेक्षा 7 वर्ष 3 महिने मागे आहे. कारण या देशाचं कॅलेंडरच तसं सांगतं. येवढचं नाही तर या  देशात 12 ऐवजी 13 महिने आहे. त्यामुळं हा देश जगापेक्षा वर्ष आणि वेळेनुसार मागे का आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. इथोपिया 7 वर्ष 3 महिने मागे अफ्रिकेतील इथोपिया देश हा जगापेक्षा अनेक वर्ष मागे आहे. इथोपिया देश जगापेक्षा तब्बल 7 वर्ष 3 महिने मागे आहे. इथोपिया देशाची लोकसंख्या तब्बल 85 लाख येवढी आहे. इथोपियाचं कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा तब्बल पावणे आठ वर्ष मागे आहे.  ग्रेगोरियन कॅलेंडरची सुरवात 1582 साली झाली होती. त्या आधी जुलियन कॅलेंडरचा वापर करण्यात आला होता. ख्रिश्चन चर्चला मानणाऱ्या देशांनी या कॅलेंडरचा स्वीकार केला होता. तर काही देश या कॅलेंडरचा विरोध करत होते. त्यात इथोपियन देशही होता. त्यामुळं इथोपिया देश जगापेक्षा पुष्कळ मागे आहे. कॅलेंडरनुसार देशातील लोकं नवं वर्ष 13 महिन्याच्या 11 डिसेंबरला साजरा करतात.  नवं वर्ष देशात मोठ्या आनंदात आणि उत्सवात साजरं करण्यात येतं. इथोपियात सुरू आहे 2012 वर्ष इथोपिया देशावर रोमन चर्चची छाप आहे. त्यामुळं इथोपियान ऑर्थोडॉक्स चर्च येशू ख्रिस्ताचा जन्म 7 बीसीत झाला असं मानतं. त्यानुसार कॅलेंडरची गणना सुरू झाली. मात्र जगातील इतर देश येशू ख्रिस्ताचा जन्म एसी-1 असल्याचं मानतो. त्यामुळंच इथोपिया देशाचं कॅलेंडर अजूनही 2012 वर्षावरच अडकलेलं आहे. तर इतर देशात 2020 सालं सुरू झालं. एका वर्षात 13 महिने इथोपिनय कॅलेंडरमध्ये एका वर्षात 13 महिने असतात. तर इतर सर्व देशाच्या कॅलेंडरमध्ये वर्षाला 12 महिने आहेत.  इथोपियाच्या कॅलेंडरमध्ये 12 महिन्यात 30 दिवस येतात. तर तेराव्या महिन्याला पाग्युमे असं म्हणतात. हा महिना पाच किंवा सहा दिवसाचा असतो. जे दिवस वर्षात येत नाही त्या दिवसासाठी 13 वा महिना तयार करण्यात आला. पर्यटकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाते इथोपिया देश जगापेक्षा 7 वर्ष मागे असल्यानं त्याचा त्रास इथं येणाऱ्या पर्यटकांना होतो. हॉटेल आणि इतर ठिकाणी लावण्यात आलेले कॅलेंडर पाहून पर्यटकांचा गोंधळ उडतो. त्यामुळं ह्या कॅलेंडरमुळं पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी सरकार आणि तिथले नागरिक घेत असतात. इथोपिया म्हणजे सुंदरतेची खाण इथोपिया देशाचे अनेक वैशिष्ट्ये आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत इथोपियातील सर्वाधिक जागा आहेत. जगातील सर्वात लांब गृहा या देशात आहे. तर जगातील सर्वात गरम जागाही इथेच आहे. सांस्कृतिक आणि सौंदर्याची खाण या देशात पाहायला मिळते. त्यामुळच जगभरातून लाखो पर्यटक या देशाला पसंती देतात. हेही वाचा- या देशात तयार होतंय हिंदूंचं पाचवं धाम, 500 एकरात आहे मंदिर पत्नीचे केस विंचरताना पती करत होता अश्लिल चाळे, व्हायरल VIDEOने अशी घडवली अद्दल
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Ethiopia 7 years behind, Ethiopia calendar news, Ethiopia news

    पुढील बातम्या