मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

फास्ट फूड ही काही नव्या जमान्याची ओळख नाही; उत्खननात 2000 वर्षांपूर्वीचे काय पुरावे सापडले पाहा..

फास्ट फूड ही काही नव्या जमान्याची ओळख नाही; उत्खननात 2000 वर्षांपूर्वीचे काय पुरावे सापडले पाहा..

फास्ट फूड ही काही नवी संकल्पना नाही. 2000 वर्षांपूर्वी पुरातन संस्कृतीत लोक काय खायचे याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत.

फास्ट फूड ही काही नवी संकल्पना नाही. 2000 वर्षांपूर्वी पुरातन संस्कृतीत लोक काय खायचे याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत.

फास्ट फूड ही काही नवी संकल्पना नाही. 2000 वर्षांपूर्वी पुरातन संस्कृतीत लोक काय खायचे याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत.

रोम, 28 डिसेंबर : Fast Food ही नव्या जमान्यातली किंवा तरुणाईची संकल्पना मानली जाते. हल्लीच्या जगाने फास्ट फूड संस्कृती अंगिकारल्याने कसं नुकसात होत आहे. पूर्वीचं पारंपरिक अन्न कसं चांगलं वगैरे आपण नेहमी ऐकतो, पण रोममधल्या एका उत्खननात काय सापडलं हे वाचून धक्का बसेल. पुरातन रोम (Rome) नागरिक फास्ट फूडचे सेवन करत असावेत, यास आता काही प्रमाणात पुष्टी मिळाली आहे. तसंच काही या उत्खननात सापडलं.

अॅश ऑफ पोम्पई (Ash Of Pompii) येथे सुरू असलेल्या उत्खननात संशोधकांना 2000 वर्षांपूर्वीच्या फास्ट फूडची (Fast food) विक्री करणाऱ्या दुकानांचे अवशेष सापडले आहेत.

हे स्नॅक बार काऊंटर पॉलिक्रोम पॅटर्न्स आणि ज्वालामुखीच्या राखेने सुशोभित केले आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी उत्खनन सुरु होते. परंतु असे अवशेष मिळू लागताच उत्खननास अधिक वेग दिला गेला आणि हा सुंदर असा स्नॅक बार (Snack Bar) जगासमोर आणला गेला.

माउंट व्हेसूव्हेयसवर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने ख्रिस्तपूर्व 70 एडीमध्ये पोम्पई हा परिसर लाव्हा रसाखाली दबला गेला. या घटनेत 2,000 ते 15,000 लोकांचा मृत्यू झाला होता. याच भागात पुरातत्व शास्त्रज्ञ (Archiologist) सातत्याने संशोधन करीत आहेत.

द थर्मोपोलियम (The Thermoplium) या शब्दातील थर्मो या ग्रीक शब्दाचा अर्थ हॉट किंवा उष्ण आणि पोलियो म्हणजे सेल किंवा विक्री. या शब्दांचा सुरेख संगम सिल्व्हर वेडिंग स्ट्रिट आणि बाल्कनींची रचना असलेल्या चौकात फास्ट फूड स्नॅक स्टॉल वसलेले होते.

या पथकाला उत्खननादरम्यान बदकांच्या हाडाचे तुकडे तसेच मातीच्या भांड्यात डुक्कर, शेळ्या, मासे आणि गोगलगायींचे अवशेष सापडले. यातील काही पदार्थ हे रोमन काळातील पॅलेसारखे एकत्र शिजवले होते. तसेच वाइनची चव अधिक असावी यासाठी वालाच्या बियांचा वापर केल्याचे यावेळी आढळून आले. या उत्खननात एका मातीच्या भांड्याच्या तळाशी या बिया सापडल्या.

उत्खननात ज्या दुकानाचे अवशेष सापडलेत ते दुकान दुकानमालकाने काही कारणांमुळे घाईत बंद केले असावे, त्यामुळे असे पदार्थांचे अवशेष सापडल्याचे, पोम्पईच्या पुरातत्व विभागाचे महासंचालक मॅसिमो ओसन्ना यांनी अंसा या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

यावेळी अॅम्फोरे कारंजे, बुरुज तसेच काही मानवी अवशेषदेखील उत्खननात सापडले. यात सुमारे 50 वर्षांचा एक माणूस लहान मुलाच्या पलंगाजवळ बसल्याचे आढळून आले. कदाचित हा वयस्क माणूस स्फोटादरम्यान मागे राहिला, आणि मरण पावला असावा, असे ओसान्ना यांनी सांगितले.

यात अजून एक मानवी अवशेष सापडला असून वाफाळते भांडे चोरुन नेण्याचा किंवा उद्रेकात पळून जाण्याचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असावा, असे प्राथमिकदृष्ट्या आढळून आल्याचे ओसान्ना यांनी सांगितले.

पुरातत्व शास्त्रज्ञांना उत्खननाच्या अखेरच्या टप्प्यात काही प्राण्यांची चित्रे आढळून आली असून तो या स्नॅक बारमधील मेन्यू असावा असा अंदाज आहे. यात मलार्ड बदके, कोंबड्यांसह वाईन तसेच गरम पेयांसह दिल्या जाणाऱ्या पदार्थांच्या चित्रांचा समावेश होता.

यापूर्वी केलेल्या उत्खननात ग्रीक पुराणातील एक जलदेवता समुद्री घोड्यावर बसून समुद्रात युध्द करीत असल्याची प्रतिमा सापडली होती. रोमन काळात थर्मोपोलियम खूपच लोकप्रिय होते. पोम्पोईमध्ये त्यांची संख्या सुमारे 80 होती. पोंम्पोईतील दैनंदिन जीवन कसे असेल याअनुषंगाने थर्मोपोलियमव्दारे विश्लेषणाची होण्याची शक्यता फारच कमी आहे कारण आम्ही प्रथमच एखाद्या जागेचे सर्व उत्खनन केले असल्याचे, ओसान्ना यांनी सांगितले.

रोमन (Roman) साम्राज्यातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक असलेले पोम्पोई हे 44 हेक्टरवर (110 एकरांवर) विस्तारले होते. मात्र ज्वालामुखीच्या राखेखाली या शहरातील भव्य इमारती, अनेक वस्तू आणि नागरिक पुरले गेले होते.

रोममधील कोलेसीयमनंतर पोम्पई हे इटलीतील (Italy) पर्यटकांच्या पसंतीचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जाते.

First published: