Home /News /videsh /

कोकेनमध्ये भेसळ झाल्याने 20 नशाबाजांचा मृत्यू, अनेकजण जखमी

कोकेनमध्ये भेसळ झाल्याने 20 नशाबाजांचा मृत्यू, अनेकजण जखमी

अर्जेंटिनात विकल्या गेलेल्या ड्रग्जमध्ये भेसळ झाल्याचं समोर आलं असून त्यामुळे अनेकांना विषबाधा झाली आहे. आतापर्यंत 20 जणांचा यात मृत्यू झाला आहे.

    अर्जेंटिना, 3 फेब्रुवारी: भेसळयुक्त कोकेनचं (Doctored Cocaine) सेवन (Consume) केल्यामुळे 20 नागरिकांचा (20 citizens) मृत्यू (Death) झाल्याच्या घटनेनं अर्जेंटिनामध्ये (Argentina) एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 75 पेक्षा अधिक (75 citizen hospitalized) नागरिकांना या कोकेनच्या सेवनानंतर त्रास व्हायला सुरुवात झाली असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. यापैकी 18 जणांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. गँगवारमधून प्रकार घडल्याचा संशय अर्जेंटिनामध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोन गँगमधील अंतर्गत संघर्षाचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे. एका गँगनं दुसऱ्या गँगगची बाजारात बदनामी करण्याच्या उद्देशानं ड्र्ग्जमध्ये भेसळ केली आणि हे भेसळयुक्त ड्रग्ज बाजारात विकलं गेल्यामुळे लोकांना आपले जीव गमवावे लागले, असं सांगितलं जात आहे. बुधवारपर्यंत 8 जणांचा या ड्रगमुळे बळी गेला होता. मात्र त्यानंतर काही तासांत मृत्यूंची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 20 जणांचा आतापर्यंत या ड्रग्जच्या सेवनामुळे मृत्यू झाला आहे, तर 75 पेक्षा अधिक जणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बाजारात पसरलंय विष नेमक्या किती नागरिकांपर्यंत हे ड्रग पोहोचलं आहे, याचा कुठलाही अंदाज अर्जेंटिनाच्या प्रशासनाला नाही. देशातील वेगवेगळ्या भागात हे ड्रग्ज वितरित करण्यात आल्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाजारात पसरलेलं हे विष तातडीने काढून घेणे आणि नागरिकांना सावध करणं गरजेचं असल्याचं समोर आलं आहे. हे वाचा- कोल्ड्रिंक ठरतंय जगासाठी विनाशकारी! या 2 बड्या कंपन्यामुळे होतंय गंभीर प्रदूषण यंत्रणेकडून सारवासारव देशात ड्रग्जचे वितरण होण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असून असे प्रकार यापूर्वी कधीही घडले नाहीत, अशी सारवासारव प्रशासनानं केली आहे. त्याचप्रमाणं ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज असतील, त्यांनी त्याचे सेवन न करता फेकून द्यावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः गेल्या 24 तासांत ज्यांनी ड्रग्ज खरेदी केले असतील, त्यांनी त्याचा वापर न करण्याची सूचना देण्यात आली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Cocaine, Crime, Crime news, Death, Drug case, Drugs, Illegal, International, Person death, Poison

    पुढील बातम्या