मराठी बातम्या /बातम्या /विदेश /काळा कुर्ता घातलेल्या दोघांनी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये पोहचवलं? पलायन नाट्याचं गूढ वाढलं

काळा कुर्ता घातलेल्या दोघांनी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये पोहचवलं? पलायन नाट्याचं गूढ वाढलं

हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याच्यावर डोमनिकामध्ये (Dominica) बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आयएएनएसने (IANS) बोटीची छायाचित्रे, अनेक कागदपत्रे, दोन जहाज आणि जहाजाच्या बोर्डवर उभ्या असलेल्या दोन काळ्या कुर्ता पायजमा घातलेल्या माणसांसह तीन लोकांचे फोटो सादर केले आहेत.

हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याच्यावर डोमनिकामध्ये (Dominica) बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आयएएनएसने (IANS) बोटीची छायाचित्रे, अनेक कागदपत्रे, दोन जहाज आणि जहाजाच्या बोर्डवर उभ्या असलेल्या दोन काळ्या कुर्ता पायजमा घातलेल्या माणसांसह तीन लोकांचे फोटो सादर केले आहेत.

हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याच्यावर डोमनिकामध्ये (Dominica) बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आयएएनएसने (IANS) बोटीची छायाचित्रे, अनेक कागदपत्रे, दोन जहाज आणि जहाजाच्या बोर्डवर उभ्या असलेल्या दोन काळ्या कुर्ता पायजमा घातलेल्या माणसांसह तीन लोकांचे फोटो सादर केले आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 4 जून: पंजाब नॅशनल बँकेचं (PNB) तब्बल 13 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याच्यावर डोमनिकामध्ये (Dominica) बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. इथं प्रवेश करण्यासाठी दोन बोटी वापरल्या गेल्याचा पुरावाही सादर करण्यात आला आहे. गुरुवारी, डोमिनिकन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बर्नी स्टीफनसन यांनी चोक्सीच्या हेबिअस कॉर्पस (Habitus Corpus) याचिकेवरील सुनावणी तहकूब केली. बुधवारी स्थानिक न्यायालयानं चोक्सीवर डोमनिका मध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप ठेवला होता. तो डोमिनिकात कसा पोहोचला याबाबत विविध तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

बोटीमध्ये कोण होते ?

या प्रकरणात आयएएनएसने (IANS) बोटीची छायाचित्रे, अनेक कागदपत्रे, दोन जहाज आणि जहाजाच्या बोर्डवर उभ्या असलेल्या दोन काळ्या कुर्ता पायजमा घातलेल्या माणसांसह तीन लोकांचे फोटो सादर केले आहेत. कॅलिऑप ऑफ अर्ने आणि लेडी अ‍ॅनी अशी नावे असलेल्या या दोन बोटी असून कॅलिऑप ऑफ अर्नमधून प्रवास करणाऱ्या लोकांच्या यादीत ब्रिटनमधील बर्मिंगहमचे रहिवासी गुरजित भंडाल आणि भारतातील  रहिवासी गुरमित सिंह अशी नावे आहेत. कोब्रा टूरच्या (Cobra Tour) नोंदीतही, कॅलिऑप ऑफ अर्नेचे प्रवासी म्हणून ब्रिटनमधील बर्मिंगहममध्ये राहणारे गुरजित भंडाल आणि भारतातील रहिवासी गुरमित सिंग यांची नावे आहेत. सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कागदपत्रांनुसार, कॅलिऑप ऑफ अर्ने ही बोट 25 मे रोजी डोमनिकाच्या पोर्ट्समाउथ बंदरावर पोहोचली.

लेडी अ‍ॅनी या बोटीवरील प्रवाशांच्या यादीतदेखील गुरजीत भंडाल यांच्यासह गुरमित सिंग हे देखील ब्रिटनचे रहिवासी असून,त्याशिवाय  कॅप्टन म्हणून एगबर्ट जोयक्स आणि युजिन डेव्हिडसन अशा दोन बोटीवरच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

युएईतील उद्योजकामुळे भारतीय तरुणाचा मृत्युदंड टळला

कोब्रा टूर्सची कॅलिऑप ऑफ अर्ने ही मोठी बोट सेंट लुसिया या कॅरिबियन देशाची आहे, तर लेडी अ‍ॅनी ही हॅकशॉ बोट चार्टर्स लिमिटेड या  सेंट लुसियातील नोंदणीकृत कंपनीची आहे. चोक्सीला अँटिग्वा इथून डोमनिका  इथं आणण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यात या दोन बोटी वापरल्या गेल्या असाव्यात, असा दावा केला जात आहे. मात्र याबाबत विचारणा करण्यासाठी चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी आणि त्याचे वकील विजय अग्रवाल यांना अनेक कॉल तसेच मेसेज करण्यात आले; पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या दोन बोटी आणि त्यावरील प्रवाशांबाबत भारत सरकारकडूनही कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

चोक्सीच्या अपहरणाचा आरोप

भारतीय वंशाच्या काही लोकांनी चोक्सीचं अँटिग्वा (Antigua) इथून अपहरण केलं आणि नंतर त्याला त्या जहाजावर चढण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा चोक्सीची पत्नी आणि त्याच्या वकीलांनी केला आहे. त्याला जबरदस्तीनं डोमनिका इथं नेण्यात आलं असून, तिथून त्याला भारतात आणणं सोपं होईल, यासाठी हा डाव रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

चोक्सीचे भारतातील वकील विजय अग्रवाल यांनी आयएएनएसला सांगितलं की, ‘चोक्सी यांना अँटिग्वा इथून जहाजात चढण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर त्यांना डोमनिका इथं नेण्यात आलं. बळाचा वापर केल्याच्या खुणाही चोक्सी यांच्या शरीरावर दिसत आहेत.

‘या प्रकरणात काहीतरी गडबड आहे. त्याला मुद्दाम दुसऱ्या ठिकाणी नेण्याची रणनीती वापरण्यात आली आहे, जेणेकरून त्याला भारतात परत आणणे सोपे जाईल. कोणत्या शक्ती यासाठी काम करत आहेत, हे मला माहित नाही;  याचं उत्तर काळचं देईल,’ असंही अगरवाल यांनी सांगितलं.

अँटिग्वाचे पोलिस आयुक्त अ‍ॅटली रॉडनी यांनी चोक्सीच्या वकिलांचा हा दावा फेटाळून लावला असून, त्याला जबरदस्तीनं इथून नेण्यात आल्याची कोणतीही माहिती त्यांच्याकडे नसल्याचं स्पष्ट केलं आहे. चोक्सी डोमनिका इथं कसे पोचले, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. डोमनिकात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. 23 मेपासून चोक्सी अँटिग्वा इथून बेपत्ता झाला होता. तीन दिवसांनंतर 26मे रोजी त्याला डोमिनिकामध्ये पकडण्यात आलं. डोमिनिकन न्यायालयानं त्याच्या वकिलांनी दाखल केलेल्या हेबिअस कॉर्पस याचिकेवर सुनावणी करून पुढील आदेश होईपर्यंत चोक्सीचे प्रत्यार्पण अनिर्णीत ठेवलं आहे.

25 वर्षाच्या हलिमानं एकसोबतच दिला 9 बाळांना जन्म, एका महिन्यानंतर आहे अशी अवस्था

बुधवारी, चोक्सी डोमनिका मधील स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर झाले आणि डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी आपण दोषी नसल्याचा दावा त्याने केला आहे.  चोक्सीचे फोटो 27 मे रोजी पहिल्यांदा ऑनलाइन प्रसिद्ध झाले  ज्यात त्याच्या हातावर काळेनिळे व्रण आणि डोळे सुजलेले दिसत होते. चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी आठ भारतीय अधिकाऱ्यांची टीम डोमिनिका इथं दाखल झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pnb