S M L

असा पडला नोटांचा पाऊस, जनतेसह पोलिसांनीही लुटल्या कोट्यवधींच्या नोटा

पैसे उचलण्याच्या नादात लोकांनी आपले प्राणही पणाला लावले. यादरम्यान रस्त्यावर अपघातही झाले.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 07:12 AM IST

असा पडला नोटांचा पाऊस, जनतेसह पोलिसांनीही लुटल्या कोट्यवधींच्या नोटा

न्युयॉर्क, १७ डिसेंबर २०१८- पैशांची गरज साऱ्यांनाच असते. मुबलक पैसा मिळावा म्हणून लोकं वाटेल ते करायला तयार असतात. एवढंच काय तर लोकं पैशांसाठी हत्याही करतात. पण, जरा विचार करा तुम्हाला जर रस्त्यांवर कोट्यवधी रुपये पडलेले दिसले तर? असंच काहीसं झालंय अमेरिकेतील न्युयॉर्क शहरात.


इथे रुखरफोर्डच्या हायवेवर पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा उचलण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली. पैसे उचलण्याच्या नादात लोकांनी आपले प्राणही पणाला लावले. यादरम्यान रस्त्यावर अपघातही झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिंक कंपनीच्या ट्रकमध्ये ५ लाख डॉलर म्हणजे अंदाजे ३.५९ कोटी रुपये होते. मात्र हायवेवरुन जाताना ट्रकचा दरवाजा योग्य पद्धतीने न लागल्यामुळे २.१५ कोटी रुपयांच्या नोटा अचानक हवेत उडू लागल्या.


Loading...

हे पाहताच लोकांनी हायवेवर गाड्या थांबवल्या आणि नोटा उचलायला लागले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, जेव्हा लोकांनी रस्त्यावर नोटा पडताना पाहिल्या, तेव्हा ते वेड्यासारखे रस्त्यावर नोटा गोळा करण्यासाठी धावू लागले. त्यांच्यासोबत काही दुर्घटना होऊ शकते अशी त कोणतीही भीती त्यांच्या मनात नव्हती. विशेष म्हणजे, रस्त्यावर पडलेल्या नोटा उचलण्यात काही पोलीसही हिरहिरेने पुढे जात होते.


VIDEO: मला चुकीच्या पद्धतीने हात लावला म्हणून मी कानाखाली पेटवली - झरीन खान


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 07:12 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close