Home /News /videsh /

न्यूयॉर्कमधील रहिवासी इमारतीला लागली भीषण आग; 9 लहान मुलांसह 19 जणांचा होरपळून मृत्यू

न्यूयॉर्कमधील रहिवासी इमारतीला लागली भीषण आग; 9 लहान मुलांसह 19 जणांचा होरपळून मृत्यू

ब्रोन्क्स येथील एका रहिवासी अपार्टमेंटमध्ये रविवारी भीषण आग (New York Fire)लागली. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, या घटनेत कमीत कमी 19 लोकांचा मृत्यू झाला आहे

    न्यूयॉर्क 10 जानेवारी : अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. ब्रोन्क्स येथील एका रहिवासी अपार्टमेंटमध्ये रविवारी भीषण आग (New York Fire)लागली. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, या घटनेत कमीत कमी 19 लोकांचा मृत्यू झाला आहे (19 People Died After Fire Breaks out in Apartment). मृतांमध्ये 9 लहान मुलांचाही समावेश आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. आग कोणत्या कारणामुळे लागली, याचा तपास सुरू आहे. ही घटना न्यूयॉर्कमधील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक मानली जात आहे. धबधब्याजवळ भलामोठा खडक कोसळला; 7 जणांचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO सीएनएनच्या रिपोर्टनुसार, घटनास्थळी पोहोचलेले महापौर एरिक अॅडम्स म्हणाले की, न्यूयॉर्क शहरासाठी हा अत्यंत भयानक आणि दुःखाचा क्षण आहे. आगीची ही घटना शहराला त्रास देत राहणार आहे. अनेक लोक आगीच्या कचाट्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 32 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या पश्चिमेला असलेल्या 19 मजली इमारतीत ही आग लागली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून आग पसरू लागली. या आगीची न्यूयॉर्कमधील सर्वात भीषण अपघातांमध्ये गणना केली जाईल, असं महापौरांनी सांगितलं. ही देशातील सर्वात वाईट घटनांपैकी एक आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 200 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बर्फवृष्टीमुळे गाड्या अडकल्या, 22 जणांना कारमध्येच गोठून मृत्यू, पाकमधील घटना आगीच्या कचाट्यात अडकलेले लोक मदतीसाठी आपल्या फ्लोअरवरुन हात हलवत होते असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. आगीत ते वाईट पद्धतीने अडकले होते. एएफपीच्या वृत्तानुसार, इमारतीजवळ राहणाऱ्या जॉर्ज किंगने सांगितलं की, 'मी येथे 15 वर्षांपासून आहे आणि अशी घटना मी प्रथमच पाहिली आहे. मला इमारतीतून धूर निघताना दिसला. मोठ्या संख्येने लोक मदतीसाठी हाक मारत होते. लोक खिडक्यांमधून हात हलवत होते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Fire

    पुढील बातम्या