मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

17 वर्षीय भारतीय नेहा बोलते... ''मी नाही सोडणार युक्रेन'', देश न सोडण्याचं दिलं हे कारण

17 वर्षीय भारतीय नेहा बोलते... ''मी नाही सोडणार युक्रेन'', देश न सोडण्याचं दिलं हे कारण

Russia-Ukraine War: रशियन हल्ल्यादरम्यान युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र यादरम्यान एका 17 वर्षीय भारतीय मुलीनं मानवी मूल्ये आणि बंधुत्वाचा आदर्श घालून दिला आहे.

Russia-Ukraine War: रशियन हल्ल्यादरम्यान युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र यादरम्यान एका 17 वर्षीय भारतीय मुलीनं मानवी मूल्ये आणि बंधुत्वाचा आदर्श घालून दिला आहे.

Russia-Ukraine War: रशियन हल्ल्यादरम्यान युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र यादरम्यान एका 17 वर्षीय भारतीय मुलीनं मानवी मूल्ये आणि बंधुत्वाचा आदर्श घालून दिला आहे.

    कीव, 27 फेब्रुवारी: रशियन हल्ल्यादरम्यान युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र यादरम्यान एका 17 वर्षीय भारतीय मुलीनं मानवी मूल्ये आणि बंधुत्वाचा आदर्श घालून दिला आहे. खरं तर तिनं युक्रेन सोडण्यास नकार दिला आहे. तिनं सांगितलं की, ती राहत असलेल्या घराचा मालक (PG) युद्धात सामील होण्यासाठी गेला आहे. अशा परिस्थितीत मुलांची काळजी घेण्यासाठी ती युक्रेनमध्ये राहणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, Ukraine मध्ये मेडिकल शिक्षण (Medical Student) घेत असलेल्या हरियाणातील 17 वर्षीय नेहा संगवाननं (Neha Sangwan) संधी दिली तरीही युद्धग्रस्त देश सोडण्यास नकार दिला. यामागचे कारण अतिशय भावनिक आहे. म्हणूनच नेहानं युक्रेन सोडण्यास दिला नकार नेहा ज्या घरामध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहते त्या घराच्या मालकानं रशियासोबत सुरू असलेल्या युद्धात आपल्या देशाची सेवा करण्यासाठी स्वेच्छेने युक्रेनच्या सैन्यात सामील झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या मागे तीन लहान मुलं आणि पत्नी आहे. अशा परिस्थितीत आपल्या पत्नीला मुलांच्या संगोपनासाठी पाठिंबा देण्यासाठी भारताच्या नेहानं युक्रेनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर नेहाला देश सोडण्याची संधी होती. नेहा सांगवान ही हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील आहे. ती आईला म्हणाली- मी जगेन किंवा नाही, पण मी या मुलांना आणि त्यांच्या आईला अशा परिस्थितीत सोडणार नाही. नेहानं गेल्या वर्षी युक्रेनमधील मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. रिपोर्टनुसार, नेहानं तिचे वडील गमावले आहेत. तिचे वडील भारतीय सैन्यात होते. सध्या नेहा तिच्या घरमालकाची पत्नी आणि तीन मुलांसह युक्रेनमधील एका बंकरमध्ये राहत आहे. मेडिकल विद्यार्थिनी नेहाची आत्या सविता जाखर यांनी आदल्या दिवशी फेसबुक पोस्टद्वारे या परिस्थितीचे वर्णन केलं आहे. त्यांनी लिहिलं की, मेडिकल शिकण्यासाठी गेलेल्या एका जवळच्या मित्राची मुलगी युक्रेनच्या कीवमध्ये अडकली आहे. हॉस्टेल न मिळाल्यानं तीन मुले असलेले कुटुंबासोबत भाड्याने घरात राहू लागली. पण आता युद्ध सुरू झाल्यानं त्यांना संकटात टाकून ती परत यायला तयार नाही. घरमालक युक्रेनच्या सैन्यात भरती झाला असून ती घरमालकाची पत्नी आणि तीन मुलांसह बंकरमध्ये राहत आहे. सविता जाखर सांगतात, नेहाशी भारतीय दूतावासानंही (Indian Embassy ) संपर्क साधला होता, पण तिने युक्रेन सोडण्यास नकार दिला. संकट संपल्यानंतरच ती परत येईल. फोनवर नेहा म्हणाली- बंकरमध्ये अनेक युक्रेनियन आहेत, जर ते सर्व हल्ल्यात मारले गेले तर मलाही त्यांच्यासोबत मरण्याचा कोणताही पश्चाताप नसेल. पण मी त्यांना एकटं सोडणार नाही. युक्रेनमध्ये भारतीयांची दयनीय अवस्था,  -7 डिग्रीत पायी पोहोचले सीमेवर अन्... भारताच्या या मुलीची ही कहाणी सोशल मीडियावर चर्चेत आहे. लोक तिच्या आत्मविश्वासाला आत्म्याला सलाम करत आहेत. तसेच तिच्या जीवासाठी प्रार्थनाही करत आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या