क्रूरतेचा कळस! 17 वर्षाच्या मुलानं आईवर 118 वेळा केले सपासप वार; पोलिसांना फोन लावून सांगितलं बॉडी बॅग आणा!

क्रूरतेचा कळस! 17 वर्षाच्या मुलानं आईवर 118 वेळा केले सपासप वार; पोलिसांना फोन लावून सांगितलं बॉडी बॅग आणा!

'मी आत्ताच माझ्या आईची हत्या केली आहे. मी तिचा गळा दाबला आणि नंतर चाकूने तिच्यावर हल्ला केला', असा स्वतःच निर्लज्जपणे पोलिसांना फोन केला.

  • Share this:

हँपशायर (ब्रिटन), 15 डिसेंबर: आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका 17 वर्षाच्या मुलानं आपल्या जन्मदात्या आईवर तब्बल 118 वेळा चाकूनं वार केले आहेत. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आईवर निर्दयी हल्ला करणाऱ्या मुलानं स्वतःच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली आणि सोबत बॉडी बॅगही घेऊन येण्यास सांगितलं. इंग्लडमधील हँपशायर याठिकाणी ही विकृत घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, 17 वर्षाच्या या निर्दयी मुलाचं नाव रोवन असून त्यानं आपली आई जोआना थॉम्पसनची हत्या केली आहे. जोआना जेव्हा सकाळी फिरायला जाऊन घरी परत आली, तेव्हा या मुलानं तिच्यावर अचानक हल्ला केला. सुरुवातीला तिचा गळा दाबला आणि त्यानंतर त्यानं आपल्या आईवर चाकूने तब्बल 118 वार केले. काही कळायच्या आत अचानक झालेल्या या हल्ल्यात जोआनानं जागीच जीव सोडला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रोवनचाही तीन महिन्यानंतर मृत्यू झाला.

सदर घटना जुलै महिन्यात घडली असून या आठवड्यात यावर सुनावणी झाली. या सुनावणीत संबंधित हल्ल्याची सर्व माहिती समोर आली आहे. सुनावणीच्या वेळी हेही माहित झालं की, रोवन आपल्या वडिलांसोबत एका वेगळ्या ठिकाणी राहत होता. तो अधून मधून आईला भेटायला येत असायचा. यावेळीही तो आपल्या आईला भेटायला आला होता. रोवनने आपल्या आईची हत्या केल्यानंतर पोलिसांना फोन करून याची माहिती दिली होती. जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा रोवन शांतपणे बसला होता. त्यावेळी त्यानं पोलिसांना सांगितलं की, 'मी आत्ताच माझ्या आईची हत्या केली आहे. मी तिचा गळा दाबला आणि नंतर चाकूने तिच्यावर हल्ला केला.'

रोवनला अटक करणाऱ्या पोलिसानं सांगितलं की, रोवनचं आपल्या मांजरीवर विशेष प्रेम होतं. तसंच त्याला काही प्रमाणात मानसिक आजार होते. त्याला यापूर्वी मेंटल हेल्थ हॉस्पिटलमध्ये देखील दाखल केलं होतं. तसेच या दुर्देवी हत्येच्या आदल्या दिवशी त्याची आईसोबच भांडणही झालं होतं. त्यामुळेचं त्यानं रागाच्या भरात  आपल्या आईची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

Published by: News18 Desk
First published: December 15, 2020, 6:55 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या