16 वर्षांच्या मुलीसाठी 'या' देशाच्या पंतप्रधानांनी सोडलं आपलं पद! कारण वाचून कराल कौतुक

16 वर्षांच्या मुलीसाठी 'या' देशाच्या पंतप्रधानांनी सोडलं आपलं पद! कारण वाचून कराल कौतुक

फिनलॅंडच्या पंतप्रधान सना मारिन यांनी देशातील लैंगिक भेदभाव दूर करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून अॅवा मुर्तो यांच्यासाठी एक दिवस आपले पद सोडले.

  • Share this:

हेलसिंकी, 09 ऑक्टोबर : अनिल कपूर यांचा नायक सिनेमा सर्वांनी पाहिलाच असेल. या सिनेमात अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनतात, आता हा सिनेमा असला एका देशात मात्र असा प्रकार घडला. फिनलॅंडमध्ये (Finland) एका 16 वर्षीय मुलीला एका दिवसासाठी पंतप्रधान करण्यात आले. फिनलॅंडच्या पंतप्रधान सना मारिन (Sanna Marin) यांनी हवामान आणि मानवाधिकार या मुद्द्यांवर सक्रियपणे मोहीम राबविणाऱ्या 16 वर्षीय अॅवा मुर्तोला (Aava Murto) एका दिवसासाठी पंतप्रधान होण्याची संधी दिली. देशातून लैंगिक भेदभाव दूर करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून हा पुरस्कार अॅवा मुर्तो यांना देण्यात आला.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, फिनलॅंडच्या पंतप्रधान सना मारिन यांनी देशातील लैंगिक भेदभाव दूर करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून अॅवा मुर्तो यांच्यासाठी एक दिवस आपले पद सोडले. या एक दिवसीय कालावधीत, मुर्तो राजकारण्यांना भेटून तंत्रज्ञानामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व आणि त्यांचे हक्क याबद्दल बोलतील. मुर्तो यांनी भाषणात म्हटले की मुलींनी चालवलेल्या टेकओव्हरसारख्या मोहिमेची गरजच पडली नाही पाहिजे.

वाचा-अरे बापरे! दोन दशकांपूर्वी पृथ्वीवरील सर्व माणसं होती एकत्र; काय आहे हा प्रकार?

मुर्तो पुढे म्हणाली की, आज इथे तुमच्यासमोर बोलण्यात मला आनंद होत आहे. खरं म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर कुठेही लिंग समानता नाही. आम्ही या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे मात्र अजून बरेच काम बाकी आहे. त्याच वेळी, फिनलँडची पंतप्रधान सना मारिन म्हणाल्या की सर्वांना तंत्रज्ञानाची सुलभता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.

वाचा-Tiktok चा नाद जिवावर उठला! अतरंगी VIDEO करताना स्वतःवरच केलं शूट

दरवर्षी फिनलॅंडमध्ये केला जातो प्रयोग

खरं तर, मानवतावादी संघटना प्लॅन इंटरनेशनल (Plan International) गेली चार वर्ष गर्ल्स टेकओव्हर उपक्रम चालवत आहे. ही संघटना जगभरातील देशातील मुलींना किशोरींनी पुढाकार घेऊन एक दिवस इतर नेते व इतर क्षेत्रातील प्रमुखांची भूमिका निभावतात. यावर्षी संस्थेसाठी जोर देण्यात आला आहे की मुलींसाठी डिजिटल कौशल्ये आणि तांत्रिक संधींना प्रोत्साहन द्या.

वाचा-जगभरात Corona चं संकट असताना चिनी नागरिक लुटत आहेत सुट्ट्यांचा आनंद, पाहा PHOTO

सर्वात युवा पंतप्रधान सना मारिन

सना मारिन केवळ वयाच्या 34 व्या वर्षी पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या जगातील सर्वात तरुण महिला आहेत. मारिन फिनलँडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. सध्या त्या केंद्रात अन्य चार पक्षांसह युतीच्या नेतृत्वात आहेत. या चार पक्षांच्या अध्यक्षा महिला आहेत आणि त्यापैकी तीन महिलांचे वय 35 वर्षांखालील आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 9, 2020, 10:02 AM IST
Tags:

ताज्या बातम्या