• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • Pakistan Earthquake : पहाटे साडेतीन वाजता भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं पाकिस्तान; आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू

Pakistan Earthquake : पहाटे साडेतीन वाजता भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं पाकिस्तान; आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पाकिस्तानच्या दक्षिणेकडील हरनाई भागात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले, यात किमान 15 लोकांचा मृत्यू (15 killed in Earthquake in Southern Pakistan) झाल्याची माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  इस्लामाबाद 07 ऑक्टोबर : आज पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तान हादरलं (Earthquake in Pakistan). पाकिस्तानच्या दक्षिणेकडील हरनाई भागात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले, यात किमान 15 लोकांचा मृत्यू (15 Killed in Earthquake in Southern Pakistan) झाल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, आज पहाटे साडेतीनच्या सुमारास 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप पाकिस्तानाच्या हरनाई येथे झाला. सध्या मृतांची संख्या तपासली जात आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे दक्षिण पाकिस्तानात आलेल्या भूकंपामध्ये किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. बलुचिस्तानच्या प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुखाने एएफपीला सांगितलं, की आतापर्यंत 15 ते 20 लोकांचा बळी गेला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. प्रणामी संप्रदाय: कुराण-गीता दोन्हीचं पठण; गांधीजींच्या आई होत्या अनुयायी भूकंप आल्यास काय करावं? भूकंप आला असताना जर तुम्ही घरात असाल तर खाली जमिनीवर/फरशीवर बसा. घरात टेबल किंवा फर्निचर असेल तर त्याच्या खाली बसा आणि हातानं आपलं डोकं झाकून घ्या. भूकंपाचे हादरे जाणवत असताना घरातच थांबा आणि सगळं शांत झाल्यावरच बाहेर या. भूकंपाच्या दरम्यान घरातील सर्व लाईट बंद करून ठेवा. Lakhimpur : राहुल आणि प्रियांका गांधींनी घेतली मृत शेतकरी कुटुंबीयांची भेट भूकंप आल्यावर काय करू नये? भूकंप आलेला असताना जर तुम्ही घराच्या बाहेर असाल तर उंच इमारती आणि विजेच्या खांबापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. भूकंपाच्या वेळी तुम्ही घरात असाल तर बाहेर निघू नका. जिथे आहात तिथेच स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा. भूकंप आलेला असताना जर तुम्ही घरात असाल तर दरवाजे, खिडक्या आणि भितींपासून दूर राहा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर चुकूनही करू नका.
  Published by:Kiran Pharate
  First published: