Home /News /videsh /

बापरे! पूर्ण बंगलाच ट्रकवर लादून केला शिफ्ट; खर्च ऐकून बसेल धक्का

बापरे! पूर्ण बंगलाच ट्रकवर लादून केला शिफ्ट; खर्च ऐकून बसेल धक्का

139 वर्षांपूर्वी उभारलेली अलिशान इमारत ट्रकच्या (Truck) साहाय्याने दुसऱ्या ठिकाणी हलवली आहे. ही इमारत दोन मजली (two storey house) असून तब्बल 5 हजार स्क्वेअर फूट आहे.

  सॅन फ्रान्सिस्को, 23 फेब्रुवारी: एखाद्या ठिकाणी घर बांधणं आणि तसंच्या तसं दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणं, ही कल्पनाही करता येत नाही. पण असं घडलं आहे. कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण अमेरिकेतील एका शहरात तब्बल 5 हजार स्क्वेअर फूटची भक्कम इमारत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात (building pulled by truck) आली आहे. यासाठी एका मोठ्या ट्रकचा (Truck) वापर करण्यात आला आहे. शिवाय यासाठी 15 वेगवेगळ्या संस्थांची परवानगी काढण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरातील आहे. या शहरात 139 वर्षांपूर्वी उभारलेली अलिशान इमारत ट्रकच्या साहाय्याने दुसऱ्या ठिकाणी हलवली आहे. ही इमारत दोन मजली असून तब्बल 5 हजार स्क्वेअर फूट आहे. या इमारतीत 6 बेडरूम आहेत. या इमारतीला सॅन फ्रान्सिस्को येथील एका रस्तावरून हलवून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं आहे. फोटो सौजन्य - द गार्डीयन
  फोटो सौजन्य - द गार्डीयन
  या इमारतीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तब्बल सहा तासांचा कालावधी लागला आहे. यावेळी संबंधित ट्रक 1.61 किमी प्रतितास वेगाने चालवले होते. हा दुमजली बंगला रस्त्यावरून नेत असताना अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. तर काही घरांचं नुकसानही झालं आहे. (वाचा-OMG! हरणाच्या डोळ्यात उगवले केस; पाहून पशुतज्ज्ञही हादरले) खरं तर, ही इमारत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी तब्बल 2.9 करोड रुपये खर्च करण्यात आले आहेत. यावेळी अवजड वाहतूक करणारे ट्रक वापरले होते. या ट्रकचा ताशी 1.61 किमी वेग ठेवण्यात आला होता. ही इमारत हलवण्यापूर्वी ज्यामार्गाने इमारत घेवून जायची आहे. त्याचं मापही घेण्यात आलं होतं. यावेळी रस्त्यावरील झाडांच्या किरकोळ नुकसानी व्यतिरिक्त कोणतंही नुकसान झालेलं नाही.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: United States of America

  पुढील बातम्या