धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलामुळे गरोदर झाली 13 वर्षांची मुलगी, डॉक्टरही झाले हैराण

धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलामुळे गरोदर झाली 13 वर्षांची मुलगी, डॉक्टरही झाले हैराण

सोशल मीडियाच्या जंगलात हल्लीची तरुणाई अखंड बुडाली आहे. प्रेम प्रकरणाचे अनेक किस्से आणि त्यातून गुन्हेगारी उफाळली आहे.

  • Share this:

झेलेझ्नोगोर्स्क (रशिया), 27 जानेवारी : सोशल मीडियाच्या जंगलात हल्लीची तरुणाई अखंड बुडाली आहे. प्रेम प्रकरणाचे अनेक किस्से आणि त्यातून गुन्हेगारी उफाळली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला 10 वर्षाच्या मुलापासून दिवस गेले आहे. गर्भवती झाल्यानंतर मुलीने दावा केला आहे की तिच्या पोटात वाढणारं मुल हे तिच्या 10 वर्षाच्या प्रियकराचे आहे. मुलीने सांगितले आहे की ती सुमारे एक वर्षापूर्वी मुलाला भेटली आणि पहिल्या नजरेत हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

डारिया आणि इव्हान नावाचे जोडपे रशियाच्या झेलेझ्नोगोर्स्क शहरातील रहिवासी आहेत. दोन्ही मुलांनी टीव्ही कार्यक्रमात भाग घेतला आणि त्यांच्या नात्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांची कथा 'द रोसिया 1' चॅनल शो 'फादर अ‍ॅट 10 !?' मध्ये दाखवली गेली आहे.

वाचा-22 वर्षांच्या तरुणाचं 60 वर्षांच्या महिलेशी होते संबंध, पत्तीने रंगेहात पकडलं

इव्हानची तपासणी करणारे डॉक्टर इवागिनी ग्रीकोव्ह म्हणतात की, शुक्राणू तयार करण्यास तो खूपच लहान आहे, तो मुलाचा पिता होऊ शकत नाही. पण मुलगी नाकारते की तिचा इतर कोणताही साथीदार नव्हता. एका सायकलस्वारानं मुलीच्या वक्तव्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

वाचा-लग्नकार्यात पैशावरून झाला राडा, तरुणाला बेदम मारहाण करून लुटले

द सनच्या म्हणण्यानुसार, पालकांच्या संमतीने दोन्ही मुले टीव्ही शोमध्ये सहभागी झाली. पालकांनी मुलांच्या वैद्यकीय तपासणीस परवानगी दिली. या जोडप्याबद्दल स्थानिक समाजात तीव्र चर्चा रंगली आहे. 8 आठवड्याची गर्भवती डारिया आणि तिची आई बाळाला ठेवू इच्छित आहेत. डारियाची 35 वर्षीय आई एलेना म्हणाली की तिच्या मुलीने स्वतःच या नात्याची कबुली दिली आहे.

वाचा-'500 कोटी द्या मुख्यमंत्री होऊन दाखवतो', प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य

त्याच वेळी, इव्हानच्या आईला देखील वाटते की त्यांचा मुलगा खरं बोलत आहे. तो एका मुलाचा बाप होणार आहे. खरंतर त्याला स्वतः याबाबत काही माहित नसेल. त्याने जे केले हे खरं असलं तरी हे सगळं कळण्यासाठी तो खूप लहान आहे. डारिया म्हणाली की, ती आणि तिचा प्रियकर एकमेकांची पूर्ण काळजी घेतात. दोघांनीही सोशल मीडियावर मॅरेड म्हणून स्वत: ला लिहिले आहे. मात्र, या दाम्पत्याला स्थानिक समाजातील लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

First published: January 24, 2020, 1:12 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या