मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जळत्या मेणबत्तीजवळ उभं राहून Deodorant लावत होता मुलगा, अचानक स्फोट झाला आणि....

जळत्या मेणबत्तीजवळ उभं राहून Deodorant लावत होता मुलगा, अचानक स्फोट झाला आणि....

एका मुलाने जळत्या मेणबत्तीजवळ उभं राहून डियोड्रेंटचा वापर केला आणि भयंकर स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण इमारतीत एकच खळबळ माजली.

एका मुलाने जळत्या मेणबत्तीजवळ उभं राहून डियोड्रेंटचा वापर केला आणि भयंकर स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण इमारतीत एकच खळबळ माजली.

एका मुलाने जळत्या मेणबत्तीजवळ उभं राहून डियोड्रेंटचा वापर केला आणि भयंकर स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण इमारतीत एकच खळबळ माजली.

  • Published by:  Karishma

लंडन, 14 ऑक्टोबर : ब्रिटनमध्ये एका 13 वर्षांच्या मुलामुले संपूर्ण इमारतीतील रहिवाशांचं आयुष्य धोक्यात आलं. एका मुलाने जळत्या मेणबत्तीजवळ उभं राहून डियोड्रेंटचा वापर केला आणि जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण इमारतीत  एकच खळबळ माजली. मेणबत्ती आणि डियोड्रेंट एकमेकांच्या संपर्कात आल्याने आगीचा भडका उडाला. तब्बल 70 फायर फायटरने घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवलं.

द सनच्या रिपोर्टनुसार, या भयंकर घटनेनंतर 13 वर्षीय मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मुलगा गंभीररित्या भाजला असून त्याच्या पोटावर आणि हातावर अनेक जखमा झाल्या आहेत.

मुलाच्या आईने  सांगितलं, की मुलगा डियोड्रेंटचा वापर करत असताना, बाजूलाच टी-लाइट कँडल होती. डियोड्रेंटचे काही तुषार त्यावर उडाले आणि अचानक आग लागली. आग लागण्यासह जोरदार स्फोटही झाला. या स्फोटामुळे बेडरुमच्या खिडकीच्या काचाही तुटल्या. त्यानंतर आग वेगाने पसरु लागली. या घटनेवेळी मी घरी नव्हती. काही सामान आणण्यासाठी मी जवळच्या दुकानात गेली होती. माझ्या मुलीने फोन करुन घरात स्फोट झाल्याचं सांगितलं. मी लगेचच घरी पोहोचली, तर बेडरुममध्ये आग पसरल्याचं दिसलं. बेडरुमच्या खिडकीच्या काचा फुटल्याचंही त्यांनी सांगितलं.

'माणसांना पंख असते तर..'; चिमुकल्याने चक्क घारीसारखी घेतली भरारी; पाहा VIDEO

लगेच फायर ब्रिगेटला कॉल करण्यात आला. जवळपास 70 फायर फायटर घटनास्थळी पोहचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. रात्री 8 च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर इमारतीतील अनेक लोक आपला जीव वाचवण्यासाठी इथे-तिथे पळू लागले. भयंकर हादऱ्यानंतर इमारतीसह या परिसरातही मोठी खळबळ माजली.

अचानक रिव्हर्स जाणाऱ्या कारमधून बाहेर पडले मायलेक अन्...; घाटातील अपघाताचा VIDEO

डियोड्रेंट किंवा सॅनिटायझरसारख्या वस्तूंचा वापर करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. या वस्तू एखाद्या मेणबत्तीसारख्या गोष्टीच्या संपर्कात आल्यास, आगीचा धोका निर्माण होतो. त्यामुळेच खबरदारी घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Fire