मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'10 मुलं जन्माला घालणाऱ्या महिलांना मिळणार 13 लाख रुपये', सरकारने दिली अजब ऑफर कारण...

'10 मुलं जन्माला घालणाऱ्या महिलांना मिळणार 13 लाख रुपये', सरकारने दिली अजब ऑफर कारण...

जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी पुतिन सरकारने दिली ऑफर (प्रतीकात्मक फोटो)

जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी पुतिन सरकारने दिली ऑफर (प्रतीकात्मक फोटो)

सरकारच देशातील नागरिकांना 10 किंवा त्यापेक्षा अधिक मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

    मॉस्को, 18 ऑगस्ट : पूर्वी महिला बऱ्याच मुलांना जन्म देत होत्या. काही कालावधीने दाम्पत्य दोनच मुलांवर थांबू लागले आणि आता तर एकाच मुलावर समाधान मानणारे बरेच दाम्पत्य आहे. भारतासह काही देशात हम दो हमारे दो, वन चाइल्ड पॉलिसी अशा योजनांवर भर दिला जात असताना रशियात मात्र जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालण्यासाठी सरकार प्रोत्साहन देतं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रशिया सरकारने महिलांना दहा मुलं जन्माला घालण्याचे आदेश दिले आहे. इतकंच नव्हे तर या महिलांना यासाठी 13 लाख रुपयांची ऑफऱही दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ही धक्कादायक घोषणा केली आहे. त्यांनी देशातील महिलांना 10 किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना जन्म देण्यास सांगितलं आहे. 10 मुलांना जन्म देणाऱ्या मातांना साडेतेरा हजार पाऊंड म्हणजे 13 लाख रुपये दिले जाणार आहेत. कोरोना महासाथ आणि युक्रेनसोबत युद्ध यामुळे रशियावर लोकसंख्येचं संकट ओढावलं आहे. रशियातील घटत्या लोकसंख्येचं संकट पाहता त्यावर उपाय म्हणून पुतिनने हे आदेश जारी केल्याचं सांगितलं जातं आहे.  तिला मदर हीरोईन स्किम अंतर्गत 13 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. यासाठी ती महिला रशिया संघाची नागरिक असणं गरेजचं आहे. जर एखाद्या महिलेने आपात्कालीन स्थितीमुळे किंवा दहशतवादी हल्ल्यामुळे आपलं मूल गमावलं तरी ती यासाठी पात्र असेल. हे वाचा - तिचा गुन्हा इतकाच की Tweet केलं! 'त्या' ट्विटमुळे महिलेला 34 वर्षांचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण? रशियातील सुरक्ष तज्ज्ञ डॉ. जेनी मॅथर्स यांनी सांगितल्यानुसार, पुतिन यांच्या मते ज्या कुटुंबात जास्त सदस्य आहे, ते जास्त देशभक्त राहिले आहेत.  सोव्हियत युगातील हा पुरस्कार त्या महिलांना दिला जातो ज्यांना 10 किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असतात. पुतिन सरकार मदर हीरोईन अवॉर्डमार्फत लोकांना मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहीत करत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Russia, Small child, World news

    पुढील बातम्या