लेस कायेस, 16 ऑगस्ट: कॅरिबियन देश असणाऱ्या हैती याठिकाणी शनिवारी 7.2 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंप (Earthquake in Haiti) आला होता. हा भूकंप इतका भयानक होता की, शहारातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहे. हैती भूकंपात आतापर्यंत किमान 1297 लोकांचा मृत्यू (Death in Earthquake) झाल्याची माहिती समोर आली आहे, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेक लोकं अद्याप बेपत्ता आहेत. तर जवळपास 2800 लोकं गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. सर्वाधिक जीवितहानी देशाच्या दक्षिण भागात झाली आहे. भूंकपंच्या दोन दिवसांनंतरही बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
खरंतर, हैतीचे नागरी संरक्षण एजन्सीचे संचालक जेरी चँडलर यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, हैती भूकंपात मृतांचा आकडा 304 आहे. यानंतर भूकंपाचं रौद्ररूप समोर आलं आहे. शनिवार आलेल्या भूकंपामुळं हैतीतील अनेक शहरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच भूस्खलनामुळे बचाव कार्यातही अनेक अडथळे येत आहेत. आधीच कोरोना विषाणूच्या साथीमुळं वाईट अवस्था असणाऱ्या हैतीत भूकंपामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
हेही वाचा-अफगाणिस्तान सोडल्यानंतर अशरफ गनींची FB Post, सांगितलं देश सोडण्याचं कारण
या शक्तीशाली भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून सुमारे 125 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती यूएसचे भूवैज्ञानिकांनी दिली आहे. येत्या आठवड्याच्या येथील संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण सोमवारी किंवा मंगळवारी हैतीत ग्रेस चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता आहे. हैतीच्या पंतप्रधानांनी देशभरात एक महिन्यासाठी आणीबाणी घोषीत केली आहे. तसेच नुकसानीचा संपूर्ण तपशील समोर आल्याशिवाय आंतरराष्ट्रीय मदत घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, काही शहरं पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत.
हेही वाचा-'तालिबान आम्हाला जिवंत सोडणार नाही', अफगाणिस्तानहून भारतात आलेल्या महिलेचा टाहो
त्यांनी पुढे सांगितलं की, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसकडून भूकंपग्रस्त भागातील रुग्णालयात जखमींची काळजी घेतली जात आहे. तसेच त्यांनी हैतीतील लोकांना संकट काळात एकत्र येण्याचं आवाहन केलं. आपल्याला विविध गोष्टींची कमतरता आहे. जखमींची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी अन्नासह तात्पुरता निवारा आणि मानसिक आधाराची लोकांना गरज आहे, असंही ते म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.