हातावर फोन नंबर, अन् आईने दिलेली चिठ्ठी...रशिया युक्रेन युद्धात 11वर्षीय चिमुकल्याचा 1000 किमी प्रवास
हातावर फोन नंबर, अन् आईने दिलेली चिठ्ठी...रशिया युक्रेन युद्धात 11वर्षीय चिमुकल्याचा 1000 किमी प्रवास
Boy, 11, travels 1400 km to Ukrainian border holding his mother’s letter in his hand
रशिया आणि युक्रेनमध्ये(Ukraine Russia War) सुरू असलेल्या युद्धात मोठी जीवित तसंच वित्त हानीही होते आहे. युद्धाच्या परिस्थितीपासून वाचण्यासाठी अनेक जण आपापल्या देशात परतत आहेत किंवा आपल्या कुटुंबियांसह देश सोडून इतर दुसऱ्या देशात जात आहेत. अशा परिस्थितीत एका चिमुकल्याने तब्बल 1000 किलोमीटरचा पल्ला एकट्याने पार(11 year old ukrainian boy travels alone) केला आहे. या मुलाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
नवी दिल्ली, 9 मार्च: रशिया आणि युक्रेनमध्ये(Ukraine Russia War) सुरू असलेल्या युद्धात मोठी जीवित तसंच वित्त हानीही होते आहे. युद्धाच्या परिस्थितीपासून वाचण्यासाठी अनेक जण आपापल्या देशात परतत आहेत किंवा आपल्या कुटुंबियांसह देश सोडून इतर दुसऱ्या देशात जात आहेत. अशा परिस्थितीत 11वर्षीय चिमुकल्याची चकित करणारी गोष्ट समोर आली आहे. एका चिमुकल्याने तब्बल 1000 किलोमीटरचा पल्ला एकट्याने पार(11 year old ukrainian boy travels alone) केला आहे. या मुलाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
या युद्धानेच लहान वयातच चिमुकल्याचे मन इतके मजबूत केले की त्याने युक्रेन ते स्लोवाकिया असा एकट्याने प्रवास (ukrainian boy travels to slovakia alone) केला. त्याच्यासोबत केवळ आईने दिलेली चिठ्ठी आणि जिवंत राहण्याची हिंमत होती. मिळालेल्या माहितीनुसार, हा चिमुकला दक्षिण-पूर्व युक्रेनमधील झापोरिझ्झ्या येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाच्या आईने त्याला त्यांच्या स्लोवाकिया येथील नातेवाईकांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. स्लोवाकिया येथे पोहचल्यानंतर तेथील नातेवाईकांना शोधण्यासाठी त्यांच्या आईने एक चिठ्ठी लिहून दिली होती. मुलाकडे एक प्लॉस्टिक बॅग, पासपोर्ट आणि मेसेज लिहिलेला कागद होता.
एका आजारी असलेल्या नातेवाईकांची देखभाल करण्यासाठी या मुलाच्या आई-वडिलांना युक्रेनमध्ये राहवं लागलं. अशा युद्धाच्या स्थितीत आपल्या मुलाला युक्रेनमधून बाहेर काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
या सामानासह मुलगा स्लोवाकिया इथे पोहोचला. त्यानंतर सीमेवरील अधिकाऱ्यांनी त्या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेतला. नातेवाईकांशी संपर्क झाल्यानंतर मुलाला त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. त्या मुलाकडील चठ्ठीत त्यांच्या आईने स्लोवाकिया सरकार आणि पोलिसांचे आपल्या मुलाची काळजी घेतल्याबाबत आधीच आभार व्यक्त केले होते.
स्लोवाकिया मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी एका पोस्टमध्ये याबाबत माहिती देत सांगितलं, की त्या मुलाच्या हातावर लिहिलेला नंबर, कागदावर लिहिलेल्या मेसेजमुळे मदत झाली. आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात यशस्वी झालो आणि मुलाचा सुरक्षित त्यांच्याकडे पोहोचला. मुलाने इतका मोठा स्लोवाकियापर्यंतचा लांबचा पल्ला एकट्याने पार केला. त्याच्या चेहऱ्यावरील हसू, त्याचा आत्मविश्वास आणि न घाबरता त्याने हा प्रवास पाहून स्लोवाकिया बॉर्डरवर पोहोचल्यानंतर तेथील अधिकारीही हैराण होते. स्लोवाकियाच्या गृहमंत्रालयाकडून एकाफेसबुक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. कालच्या रात्रीचा सर्वात मोठा हिरो असं म्हणत ही फेसबुक पोस्ट केली.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.