Home /News /videsh /

बापरे, सामान्य कॉम्प्युटरपेक्षा 1000 पटीने जलद; आता या देशाकडे सर्वात भारी सुपर कॉम्प्युटर

बापरे, सामान्य कॉम्प्युटरपेक्षा 1000 पटीने जलद; आता या देशाकडे सर्वात भारी सुपर कॉम्प्युटर

या देशाकडे अमेरिका आणि जर्मनी या देशांपेक्षांही अत्यंत जलद कॉम्प्युटर आहे

    नवी दिल्ली, 23 जून : जगभरात तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. सध्या जगाने तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक मैल जलद गतीने पार केले आहे. यातच सध्याच्या कॉम्प्युटरपेक्षाही 1000 पटीने जलद यंत्राची माहिती समोर आली आहे. जपानमधील संगणक विकसकांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडील संगणक जगातील सर्वात वेगवान संगणकांच्या शर्यतीत सर्वात वर पोहोचला आहे. जगातील 500 वेगवान संगणकांची यादी बनवणार्‍या टॉप 500 या साइटने त्यांना सर्वात वेगवान मानले आहे. अमेरिका आणि जर्मनीने सुपर कॉम्प्युटरवर एक मापदंड लावला होता. या आधारावर, जगभरातील संगणक मोजले जाते. आता जपानच्या या नवीन विक्रमातून कोरोनावरील उपचारात ठोस मदत होईल, असे मानले जात आहे. हे वाचा- ALERT! हॅकर्सनी शोधला नवा मार्ग, कोणतीही वेबसाइट उघडल्यास फोन हॅक होण्याचा धोका फुगाकूला रेकन सायंटिफिक रिसर्च सेंटर या जपानी कंपनीने तयार केले आहे. फ्युजित्सूनेही त्याच्याबरोबर काम केले. एका सेकंदामध्ये तो 415 क्वाड्रिलियनची गणना करू शकतो. यावरून फुगाकूच्या वेगाचा अंदाज केला जाऊ शकतो. श्वासोच्छवासामध्ये पाण्याचे थेंब कसे पसरले हे देखील या कम्प्युटरने शोधून काढले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार श्वासोच्छ्वासातून येणाऱ्या पाण्याच्या लहान थेंबांमुळे होतो, जो मास्क लावल्यानंतरही बर्‍याच वेळा पसरला जातो. हे वाचा - मोठा खुलासाः गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा चीननेच दिला होता आदेश वर्ष 2011 नंतर, जपानमधील संगणकास सुपर कम्प्युटरचा दर्जा देण्यात आला आहे, त्यापूर्वी संपूर्ण 9 वर्षे ही पदवी जर्मनी, तर कधी अमेरिकेला दिला जात होता. याआधी दोन वर्षे अमेरिकेच्या सुपर कम्प्यूटरला हा दर्जा दिला होता.   संपादन - मीनल गांगुर्डे
    First published:

    Tags: Computer, Japan

    पुढील बातम्या